आलिया भट्टने आडनाव का बदलले? लग्नाच्या 3 वर्षांनी स्पष्ट केलं कारण

0
आलिया भट्टने आडनाव का बदलले

आलिया भट्टने आडनाव का बदलले

आलिया भट्टने आडनाव का बदलले? लग्नानंतर 3 वर्षांनी ‘भट्ट-कपूर’ हे नाव स्वीकारण्यामागचं खरं कारण तिने सांगितलं आहे. एकटेपणाचा उल्लेख करत भावना व्यक्त.

सायली मेमाणे

पुणे १३ जून २०२५ : आलिया भट्टने आडनाव का बदलले यावर अखेर स्वतः खुलासा केला आहे. रणबीर कपूरशी लग्न करून तीन वर्षांचा काळ उलटल्यानंतर आलियाने आपलं आडनाव अधिकृतरित्या बदलल्याचं संकेत देणारे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. तिच्या ब्लॉग आणि यूट्यूब व्हिडिओमधून स्पष्ट झालं की आलिया आता “आलिया कपूर” किंवा “आलिया भट्ट-कपूर” नाव वापरत आहे. याचमुळे सोशल मीडियावर तिच्या बदललेल्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.

आलियाच्या एका यूट्यूब व्ह्लॉगमध्ये हॉटेलच्या स्वागत फलकावर ‘Alia Kapoor’ असे लिहिलेले स्पष्ट दिसले. त्यामुळे नेटकऱ्यांनी लगेच निष्कर्ष काढला की आता तिने आपलं आडनाव बदललं आहे. विशेष म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान तिच्या रूममधील टीव्ही स्क्रीनवरही हेच नाव झळकले होते, ज्याची एक झलक चाहत्यांना मिळाली.

एका मुलाखतीत आलियाने यावर स्पष्ट उत्तर दिलं की तिचं स्क्रीन नेम आलिया भट्टच राहणार आहे, पण कागदोपत्री तिने आता “Alia Bhatt-Kapoor” हे नाव स्वीकारलं आहे. ती म्हणाली, “आता आमचं मूल आहे आणि कपूर कुटुंबासोबत प्रवास करताना मी वेगळी वाटू नये असं मला वाटतं. म्हणूनच मी हे पाऊल उचललं.”

ती पुढे म्हणाली की अनेक महिन्यांपासून ती हा बदल करण्याचा विचार करत होती पण वेळ मिळत नव्हता. आता पासपोर्टसह अनेक ठिकाणी तिचं नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

आलिया आणि रणबीर कपूर यांचं लग्न एप्रिल 2022 मध्ये पार पडलं होतं. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची ओळख झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला, जिचं नाव राहा आहे.

कामाच्या आघाडीवर, आलिया भट्ट शेवटची ‘जिगरा’ चित्रपटात दिसली होती. आता ती यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या गुप्तहेरपटात शर्वरी वाघसोबत दिसणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

आता आलिया भट्टने आडनाव का बदलले याचा प्रश्न स्पष्ट झाला असून तिच्या चाहत्यांना तिच्या या वैयक्तिक निर्णयाचा आदर वाटतो आहे. एका आईचा भावनिक दृष्टिकोन आणि कुटुंबातील एकरूपतेचा विचार यामागे स्पष्ट दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *