एअर इंडिया अपघात : 4080 कोटींचा विमा दावा, भारतातील सर्वात महागडा विमान इन्शुरन्स क्लेम?

0
4080 कोटींचा विमा दावा, भारतातील सर्वात महागडा विमान इन्शुरन्स क्लेम?

4080 कोटींचा विमा दावा, भारतातील सर्वात महागडा विमान इन्शुरन्स क्लेम?

अहमदाबाद एअर इंडिया अपघातात 270 जणांचा मृत्यू; $475 दशलक्ष म्हणजेच 4080 कोटींचा विमा दावा, भारतातील सर्वात मोठा विमान विमा क्लेम.

सायली मेमाणे

१८ जुन २०२४ : विमान अपघातामुळे विमा उद्योग हादरला आहे. 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान कोसळले आणि यात 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने भारतातील नागरी उड्डाण इतिहासातील सर्वात मोठ्या विमा दाव्याला जन्म दिला असून, एअर इंडिया $475 दशलक्ष म्हणजेच सुमारे 4080 कोटी रुपयांचा विमा दावा करण्याच्या तयारीत आहे. या दाव्यामुळे देशातील विमा क्षेत्रात मोठे आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

या विमानाचे विमा संरक्षण नुकतेच 750 कोटी रुपयांवरून 850 कोटींवर वाढवले गेले होते. दुर्घटनेत मृत्यू पावलेले 242 प्रवासी आणि जमिनीवर मृत्यूमुखी पडलेले सुमारे 30 नागरिक हे या क्लेमचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. विमानाच्या अवशेष आणि इंजिनसाठी सुमारे $125 दशलक्ष (सुमारे 1075 कोटी रुपये), तर प्रवासी आणि जमिनीवरील पीडितांच्या नुकसानभरपाईसाठी $350 दशलक्ष (सुमारे 3014 कोटी रुपये) इतकी रक्कम विमा कंपनीकडून अपेक्षित आहे.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) चे प्रमुख रामास्वामी नारायणन यांनी म्हटले की, “हा भारताच्या विमानचक्रातील सर्वात मोठा विमा दावा ठरू शकतो.” यावर एअर इंडियाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. परंतु या आर्थिक भाराचा परिणाम संपूर्ण भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. कारण ही विमा रक्कम 2023 मध्ये संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्राने भरलेल्या विमा प्रीमियमपेक्षा जवळपास तीन पट अधिक आहे.

भारतीय विमान कंपन्यांच्या विमा नूतनीकरणाच्या वेळी प्रीमियमचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. परदेशी प्रवाशांबाबत त्यांच्या देशांच्या कायद्यानुसार नुकसानभरपाई दिली जाईल, ज्यामुळे एकूण क्लेम रक्कम वाढू शकते. ही आर्थिक जोखीम प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडे सुपूर्द केली गेली आहे. GIC आणि इतर भारतीय विमा कंपन्यांनी 95% पेक्षा अधिक जोखीम परदेशी पुनर्विमा कंपन्यांना हस्तांतरित केली आहे. त्यामुळे भारतीय विमा कंपन्यांवर फारसा भार पडणार नाही, पण जागतिक विमा कंपन्यांवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

या अपघातामुळे भारतातील नागरी उड्डाण सुरक्षेच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. अपघातानंतर तांत्रिक दोष, सुरक्षा उपाय आणि देखरेख प्रक्रियेबाबत चौकशी सुरु आहे. या अपघाताच्या काळात, विमा संरक्षण वाढवले गेले होते, ही बाब सुद्धा आता तपासाचा भाग बनली आहे. एअर इंडिया, टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी असून, यापूर्वीही त्यांच्यावर अनेक सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरु असून, विमा दावा प्रक्रिया आणि संभाव्य भरपाईची रक्कम हळूहळू स्पष्ट होईल.

या घटनेमुळे भारतातील विमा आणि विमान उद्योगाला मोठा धक्का बसला आहे आणि भविष्यात विमा प्रीमियमच्या दरात वाढ निश्चित दिसत आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

#AirIndiaCrash #AhmedabadAccident #InsuranceClaim #Boeing787 #IndianAviation #AviationNews #Vimadawa #InsuranceIndustry #TataAirIndia #PlaneCrashIndia #NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed