समर्थ पोलिसांची कारवाई: घरफोडीप्रकरणी तिघांना अटक, २९ गुन्हे उघड

0
समर्थ पोलिसांची कारवाई: घरफोडीप्रकरणी तिघांना अटक, २९ गुन्हे उघड

समर्थ पोलिसांची कारवाई: घरफोडीप्रकरणी तिघांना अटक, २९ गुन्हे उघड

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे यांनी घरफोडी प्रकरणातील तिघांना अटक करून रोख रक्कम व हत्यारे हस्तगत केली आहेत. अटक आरोपींपैकी एकावर तडीपारी आदेश असूनही गुन्हा केल्याचे निष्पन्न.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे २९ जुलै २०२५ : पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने एक मोठी कामगिरी करत तीन सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक केली असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या तिघांकडून लाखोंच्या घरफोडी प्रकरणातील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक २५ जून २०२५ रोजी समर्थ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ५७ हजार ६९८ रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता.

गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने समर्थ पोलीस हद्दीतील तसेच पुणे शहर परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपींची ओळख पटली आणि पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. आरोपींची नावे आहेत:
१) रोहित उर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१)
२) रोहित उर्फ रावण नानाभाऊ लंके (वय २४)
३) निखील परशुराम खांडेकर (वय २०)

तिघांनाही २४ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींकडून १०,००० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन व हत्यार हस्तगत करण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

अटक आरोपींपैकी रोहित लंके याच्यावर पुणे शहर व परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एकूण २९ गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे, याच आरोपीला ३ मे २०२४ रोजी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ यांनी मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत दोन वर्षासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र तरीही त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पुणे शहरात प्रवेश केला आणि पुन्हा गुन्हा केला, हे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त श्री. कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे, अंमलदार पागार, औपरे, वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांचा समावेश होता.

पोलिसांची ही वेगवान आणि परिणामकारक कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक दिलासा देणारी बाब ठरली आहे. पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवले आहे की गुन्हेगार कितीही चतुर असले तरी कायद्याच्या कक्षेतून सुटू शकत नाहीत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed