हिमाचलमध्ये ढगफुटी, पूर, 8 मृत्यू; 29 जूनसाठी ऑरेंज अलर्ट, नदीचं रौद्र रूप पाहून नागरिक भयभीत

0
हिमाचलमध्ये ढगफुटी,

हिमाचलमध्ये ढगफुटी,

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर, कुल्लू व कांगडामध्ये अतिवृष्टीने 8 जणांचा मृत्यू; ढगफुटीचा व्हिडीओ व्हायरल, 29 जूनसाठी IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला.

सायली मेमाणे

२७ जून २०२५ : देशभरात मान्सूनने जोर धरला असून, अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटी आणि नद्यांना आलेल्या पूरामुळे हे प्रकार घडले असून, अनेकजण बेपत्ता असल्याची भीती आहे. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट झाल्या असून, नागरिकांना नदीकाठच्या भागांतून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुल्लूमधील सेज घाट परिसरात झालेल्या ढगफुटीनंतर पार्वती नदीला अचानक पूर आला. या पूराचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ढगफुटीमुळे परीतन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने 25 जून ते 1 जुलै दरम्यान हिमाचलसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 29 जूनसाठी हिमाचलमधील बिलासपूर, सिमला, मंडी, चंबा आणि कुल्लू जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील राजौरी, डोडा आणि कठुआ जिल्ह्यांतही अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे 2 लहान मुले आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या भागांतही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गुजरात राज्यात देखील पावसाने थैमान घातले आहे. 26 जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत असून, तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. राजस्थानमध्येही जोरदार पावसाचा कहर असून, हवामान विभागाने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले असून, संभाव्य धोका लक्षात घेता एनडीआरएफ आणि इतर बचाव पथक सज्ज आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, 29 आणि 30 जून रोजी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे.

या पावसामुळे उत्तर भारतातील पर्वतीय आणि पठारी भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक ठरत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed