आकाश थोरात टोळी हल्ला : आंबेगावमध्ये जीवघेण्या हल्ल्यानंतर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल

1
आकाश थोरात टोळी हल्ला : आंबेगावमध्ये जीवघेण्या हल्ल्यानंतर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल

आकाश थोरात टोळी हल्ला : आंबेगावमध्ये जीवघेण्या हल्ल्यानंतर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल

आकाश थोरात टोळी हल्ला : आंबेगावमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू. पोलीसांनी MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला

सायली मेमाणे

पुणे ५ जून २०२५ : दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव परिसरात एक भीषण हल्ला घडला. फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीवरून कात्रजकडे जात असताना, जुन्या भांडणाच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगारी टोळीचा प्रमुख आकाश भरत थोरात आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी दुचाकी आडवी घालून धारदार शस्त्रांनी दोघांवर सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले, तर त्यांचा मित्र उपचारादरम्यान मयत झाला.

या हल्ल्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक ५३/२०२५ भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, १०९, १२६(२), ३५२, ३(५), तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, टोळीप्रमुख आकाश थोरात वय ३२, रहिवासी आंबेगाव खुर्द, त्याचे सहकारी अजित धनावडे (पाहिजे आरोपी), आदित्य शिंदे, रोहित कचरे, विशाल उर्फ मोठ्या दीपक गणेचारी यांच्यासह सहा विधी संघर्षित बालकांनी संघटित स्वरूपात हल्ला केला. त्यांनी हल्ला करताना “तुम्हाला आमच्या भाईनी बघून घ्यायला सांगीतले आहे, आता तुम्हाला जिवंत सोडत नाही” असे धमकीचे शब्द वापरले.

या टोळीविरुद्ध २०१५ पासून गंभीर स्वरूपाचे एकूण १० गुन्हे नोंदवले गेले आहेत. या गुन्ह्यांचा उद्देश परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळवणे हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आकाश थोरात याने दरवेळी वेगवेगळ्या गुन्हेगारांना हाताशी धरून गुन्हे केले आहेत. यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांची बेकायदेशीर कामे वाढतच चाललेली असल्याने कठोर कारवाई आवश्यक ठरली.

या गुन्ह्याचा तपास करताना, या टोळीने संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाईस पात्र असल्याचे पोलीसांना आढळले. यानुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे यांनी भारतीय न्याय संहिता कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) नुसार MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास अधिकृत मंजुरी दिली.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अनिवेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमुले, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडगिरी, पोउनि युवराज शिंदे आणि इतर अंमलदारांचा महत्त्वाचा सहभाग होता.

या प्रकरणामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारीविरुद्ध पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आहे. आरोपींना लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा मिळावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

1 thought on “आकाश थोरात टोळी हल्ला : आंबेगावमध्ये जीवघेण्या हल्ल्यानंतर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *