एम.बी. कॅम्प शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन – एनएक्सपी इंडिया प्रा. लि. पुणे शाखेच्या प्रमुखांच्या हस्ते लोकार्पण
एमबी कॅम्प शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम उद्घाटन; चिंत्रा फाउंडेशन व NXP चा पुढाकार
देहूरोडच्या एम.बी. कॅम्प शाळेत एनएक्सपी इंडिया प्रा. लि. पुणे शाखेचे प्रमुख आशिष भट्टड यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन झाले. १४७ विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा लाभ देणारा उपक्रम.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ३१ जुलै २०२५ :एम.बी. कॅम्प स्कूल, देहूरोड येथे ३१ जुलै २०१५ रोजी सकाळी ११ वाजता डिजिटल स्मार्ट क्लासरूम आणि एज्युकेशन फेअरचे उद्घाटन पार पडले. एनएक्सपी इंडिया प्रा. लि. च्या सहकार्याने या शाळेत दुर्बल आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा वाढवण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

एनएक्सपी इंडिया प्रा. लि., पुणे शाखेचे प्रमुख श्री. आशिष भट्टड यांच्या हस्ते नव्याने स्थापन झालेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. शाळेत १९६३ पासून सुरु असलेल्या या शिक्षण संस्थेत १५ शिक्षक आणि ८९९ विद्यार्थी शिकत आहेत.
या प्रकल्पांतर्गत यंदा इयत्ता पाचवी ते आठवीमधील १४७ विद्यार्थी आणि १५ शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले. या शाळेत चार माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते – मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी. दोन डिजिटल स्मार्ट क्लासरूम तयार करण्यात आल्या.
एक हिंदी व उर्दू माध्यमासाठी तर दुसरी मराठी व इंग्रजी माध्यमासाठी. या प्रकल्पात शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आणि डिजिटल शिक्षण पद्धती वापरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. विशेषतः इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांचे संकल्पना डिजिटल पद्धतीने शिकवल्या गेल्या.
विद्यार्थ्यांना केवळ ऐकणे नव्हे तर प्रश्नोत्तर सत्र, मॉडेल बनवणे आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी देण्यात आली. तीन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी एकूण ४५ तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एक एज्युकेशन फेअरमध्ये सहभाग घेतला आणि आपले कौशल्य व अनुभव सादर केला.
या उद्घाटन कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये शाळेच्या प्रतिनिधींनी स्वागत भाषण केले, प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अनुभव शेअर केले आणि शेवटी एनएक्सपीच्या प्रमुखांचे उद्घाटन भाषण आणि आभारप्रदर्शन झाले. हा उपक्रम एम.बी. कॅम्प शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.