घानामध्ये लष्करी हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण व पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

0
घानामध्ये लष्करी हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण व पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

घानामध्ये लष्करी हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण व पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

घानामध्ये लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत संरक्षण व पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला असून देशात राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : आफ्रिकन देश घानामध्ये ६ ऑगस्ट रोजी सकाळी एक भीषण लष्करी हेलिकॉप्टर अपघात घडला असून या दुर्घटनेत संरक्षण मंत्री एडवर्ड ओमाने बोमा, पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मोहम्मद आणि इतर सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना राजधानी अक्रा येथून ओबुआसी शहराकडे जात असताना घडली. हेलिकॉप्टर Z9 हे उड्डाणानंतर काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेले आणि अचानक त्याचा संपर्क तुटला. नंतर हे हेलिकॉप्टर दक्षिण घानामध्ये कोसळले आणि त्यानंतर भीषण आग लागली.

घटनास्थळी बचाव पथक आणि अग्निशमन दल तत्काळ दाखल झाले. आतापर्यंत चार मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण बनले आहे. या दुर्घटनेने घानामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून देशात राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये कार्यवाहक उप-राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अल्हाजी मोहम्मद मुनिरु लिमुना, नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेसचे उपाध्यक्ष सॅम्युअल सारपोंग, माजी संसदीय उमेदवार सॅम्युअल अबोआगे आणि तीन लष्करी क्रू मेंबर्स यांचा समावेश होता.

संपूर्ण देशात या घटनेमुळे शोककळा पसरली असून सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. Z9 प्रकारच्या लष्करी हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *