घोडबंदर रोडवर वाहतुकीत मोठा बदल! १४ जुलैपर्यंत वाहनांना पर्यायी मार्ग

0
ठाणे – घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

ठाणे – घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

ठाणे – घोडबंदर रस्त्यावरील मेट्रो कामामुळे २२ जून ते १४ जुलैदरम्यान रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी; जाणून घ्या पर्यायी मार्ग व वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन.

सायली मेमाणे

२४ जून २०२५ : घोडबंदर रस्त्यावर मोठे वाहतूक बदल करण्यात आले असून १४ जुलैपर्यंत रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत हे बदल लागू राहणार आहेत. ठाणेहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी मुख्य रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागला बंदर ते भाईंदरपाडा दरम्यान दोन्ही बाजूंनी काम सुरु असल्यामुळे वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. या काळात अवजड वाहनांना पिलर नंबर ८५ जवळून घोडबंदरच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली असून ती वाहने विरुद्ध दिशेने जाऊन पिलर नंबर १०२ येथून डावीकडे वळून इंडियन ऑइल पंपासमोरून मुख्य मार्गावर पुढे जातील. हलकी वाहने सेवा रस्त्याचा वापर करून इच्छित स्थळी पोहोचू शकतील. तसेच ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी नागला बंदर येथून वाईन शॉपजवळून सेवा रस्त्याचा वापर करून लोढा स्प्लेन्ड्रा येथे मुख्य रस्त्यावर प्रवेश देण्यात येणार आहे.

कल्याण-अंबरनाथ मार्गावरील वालधुनी पुलावरही अवजड आणि उंच वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी उंच वाहनांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि कमानी बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उंच वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

या काळात वाहनचालकांनी वाहतूक शाखेच्या सूचना पाळाव्यात आणि प्रवास नियोजन करताना Google Maps किंवा ट्रॅफिक अपडेट अ‍ॅप्सचा वापर करावा. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे.

Do‑follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *