त्रिपुराहून अमरनाथ यात्रेच्या ड्युटीसाठी निघालेल्या BSF जवानांसाठी रेल्वेने पाठवली तोडकी-फोडकी आणि अस्वच्छ ट्रेन
त्रिपुराहून अमरनाथ यात्रेच्या ड्युटीसाठी निघालेल्या BSF जवानांसाठी रेल्वेने पाठवली तोडकी-फोडकी आणि अस्वच्छ ट्रेन
त्रिपुराहून जम्मू-काश्मीरला अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जाणाऱ्या BSF जवानांना अत्यंत अस्वच्छ, तोडकी आणि जिर्ण अवस्थेतील ट्रेनने प्रवास करावा लागला, यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
त्रिपुरा येथून जम्मू-काश्मीरला अमरनाथ यात्रेच्या ड्युटीसाठी रवाना होणाऱ्या सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांना भारतीय रेल्वेकडून दिलेली ट्रेन अत्यंत जीर्ण, अस्वच्छ आणि तोडकी-फोडकी स्थितीत होती, यामुळे अनेक स्तरांवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जवानांच्या म्हणण्यानुसार, गाड्यांमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव होता. शौचालये वापरण्यायोग्य नव्हती, खिडक्या तुटलेल्या होत्या आणि सीट्स खराब अवस्थेत होत्या. प्रवासादरम्यान पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. प्रवास जास्त वेळाचा असूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या.
ही ट्रेन विशेषतः अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा ड्युटीसाठी जाणाऱ्या जवानांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र देशाच्या सुरक्षेसाठी नेमले गेलेले जवान अशा अवस्थेतील ट्रेनने प्रवास करत असल्याची बाब समोर येताच यावर तात्काळ चर्चेला सुरुवात झाली आहे.
या प्रकरणानंतर अनेकांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला असून, जवानांच्या प्रतिष्ठेला आणि सुरक्षेच्या गरजांना अनुसरून योग्य सुविधा दिल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू केली असल्याचे समजते.
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
Youtube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter – https://x.com/NewsDotz
1 thought on “त्रिपुराहून अमरनाथ यात्रेच्या ड्युटीसाठी निघालेल्या BSF जवानांसाठी रेल्वेने पाठवली तोडकी-फोडकी आणि अस्वच्छ ट्रेन”