दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदाची बढती; एन्काउंटर स्पेशालिस्टचा प्रेरणादायी प्रवास

0
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना बढती; सहाय्यक पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना बढती; सहाय्यक पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी

मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदाची मानाची बढती मिळाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीचा सन्मान आणि गुन्हेगारीविरोधातील त्यांचा शौर्यपूर्ण प्रवास जाणून घ्या.

सायली मेमाणे

पुणे 30 जुलै २०२५ : मुंबई: मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती देण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी ते सेवानिवृत्त होणार असून ही पदोन्नती त्यांना सेवानिवृत्तीपूर्वीचा मान म्हणून देण्यात आली आहे. दया नायक यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार यांनाही ACP पदावर बढती मिळाल्यामुळे मुंबई पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

दया नायक यांचा जन्म कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका कोकणी भाषिक कुटुंबात झाला. त्यांच्या पालकांची नावे बुद्ध आणि राधा नायक असून ते पाच भावंडांमध्ये सर्वात धाकटे आहेत. 1979 मध्ये आर्थिक अडचणीमुळे त्यांनी मुंबई गाठली आणि विविध लहान नोकऱ्या केल्यानंतर शेवटी पोलिस दलात प्रवेश मिळवला. 1995 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या दया नायक यांची 1996 मध्ये जुहू पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली. आपल्या सेवाकाळात त्यांनी 80 पेक्षा अधिक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला असून अनेक कुख्यात टोळ्यांचा खात्मा केला आहे. त्यांनी प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबतही काम केलं आहे.

2006 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांची चौकशी झाली होती. मात्र पुढील तपासानंतर त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात (ATS) तीन वर्षे कार्यरत राहून देशविरोधी कारवायांवर नकेल घालण्याचं मोठं योगदान दिलं.

सध्या ते गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटमध्ये तैनात आहेत. त्यांच्या कार्यकाळात दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदाचा मान मिळाला आहे. दया नायक हे अनेक नव्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनावर एक चित्रपटही प्रदर्शित झाला असून त्यातून त्यांच्या धाडसी कारकिर्दीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *