दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून दुहेरी अत्याचार; आरोपी अटक
दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून दुहेरी अत्याचार; आरोपी अटक
दिल्लीच्या हौज़ क़ाज़ी परिसरात ३९ वर्षीय पोऱ्याने ६५ वर्षीय आईवर दोनदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. आरोपी न्यायालयीन कारवाईसह अटक.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑगस्ट २०२५ :दिल्लीच्या हौज़ क़ाज़ी परिसरातून आलेल्या धक्कादायक बातमीनुसार, एका ३९ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय आईवर दोनदा अत्याचार करून संपूर्ण राजधानी हादरवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई परिवारासोबत वयोवृद्ध पती व इतर मुलींसह सऊदी यात्रेवर असताना, आरोपीने आपल्या वडिलांना कॉल करून त्यांना त्वरित दिल्ली परत येण्यास सांगितले आणि आईवर चरित्रहीन असल्याचा आरोप केला, तलाक देण्याचा दबाव आणला .
कुटुंब १ ऑगस्ट रोजी दिल्ली परतल्यावर, आरोपीने आईला बुरखा काढण्यास भाग पाडले, खोलीत बंद करून मारहाण केली. आई सुरक्षिततेसाठी मोठ्या मुलीच्या घरावर जाऊन थांबली; परंतु ११ ऑगस्ट रात्री नऊ वाजता तो शांतपणे बोलायच्या नावाखाली तिला पुन्हा खोलीत बंद करून चाकू आणि कात्री दाखवून अत्याचार करत “मला तू माझ्या लहानपणीचे वर्तन ‘शाप’ म्हणून देत आहेस” असे सांगितले .
या दुःखद घटनेनंतरही ती लाज आणि भीतीमुळे काही दिवस शांत राहिली, मात्र १४ ऑगस्टच्या रात्र्री ३:३० वाजता या अत्याचाराचा प्रकार दुसऱ्यांदाच घडला. मगच तिने मानसिक ताकद जमा करून तोंड उघडले आणि त्यानंतर २५ वर्षीय मुलीच्या प्रोत्साहनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली . पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे .
या प्रकाराने संपूर्ण समाजात नैतिकता आणि कुटुंब संरचनेच्या मुल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरिष्ठ तपास अधिकारी या प्रकरणाचा सखोल आणि संवेदनशीलपणे पुढे तपास करत आहेत; पीडितेला पूर्ण संरक्षण आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबात जागरुकता वाढवण्याची नितांत गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.