नांदेडमधील हॉटेलमध्ये शिक्षकाचा मृतदेह आढळला; आत्महत्या की काहीतरी वेगळं?

0
नांदेडमधील हॉटेलमध्ये शिक्षकाचा मृतदेह आढळला; आत्महत्या की काहीतरी वेगळं?

नांदेडमधील हॉटेलमध्ये शिक्षकाचा मृतदेह आढळला; आत्महत्या की काहीतरी वेगळं?

नांदेड जिल्ह्यातील लॉजमध्ये शिक्षकाचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. आत्महत्येचा संशय व्यक्त; अर्धापूर पोलीस तपास करत आहेत. वाचा सविस्तर.

सायली मेमाणे

पुणे ४ ऑगस्ट २०२५ : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आशिष भाऊसाहेब शिंदे हे मृत अवस्थेत हॉटेलच्या रुममध्ये आढळून आले. हॉटेल स्वराज फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजमध्ये ते मुक्कामी होते. शुक्रवारी रात्री त्यांनी लॉजमध्ये थांबण्याची व्यवस्था केली होती. मात्र शनिवारी सकाळी बराच वेळ होऊनही ते रुमबाहेर न आल्यामुळे वेटरला संशय आला. रुमचा दरवाजा खटखटवूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला आणि आत आशिष शिंदे यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

दरवाजा उघडताच सर्वांच्या नजरेस अत्यंत दुःखद दृश्य पडले. तत्काळ अर्धापूर पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं दिसत असलं तरी पोलिस अधिक तपास करत आहेत. शिक्षकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेमुळे शिक्षकांच्या वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा तपास लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. सध्या अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शिक्षकाचा मृतदेह लॉजमध्ये आढळल्याने हॉटेल व्यवस्थापनालाही मोठा धक्का बसला आहे. शिक्षकाच्या आत्महत्येची ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करत असून मानसिक आरोग्याविषयी जागरुकतेची गरज अधोरेखित करत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed