पिंपरी चिंचवड: महिलांचे कपडे घालून मणिपुरी तरुणाचा दरोड्याचा प्रयत्न, IT इंजिनीअर अटकेत

0
मणिपुरी तरुण महिलांचे कपडे घालून दरोड्याचा प्रयत्न करताना अटकेत

मणिपुरी तरुण महिलांचे कपडे घालून दरोड्याचा प्रयत्न करताना अटकेत

पिंपरी चिंचवडमधील कल्पतरू सोसायटीमध्ये मणिपुरी IT इंजिनीअरने महिलांचे कपडे घालून बँक मॅनेजरच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हँडगन, ग्रेनेडसदृश्य वस्तूंसह अटकेत.

सायली मेमाणे

पुणे ६ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांचे कपडे परिधान करून, चेहऱ्यावर स्कार्फ लपवून, अत्याधुनिक शस्त्रसाठ्यासह एका मणिपुरी तरुणाने उच्चभ्रू परिसरात असलेल्या बँक मॅनेजरच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कल्पतरू सोसायटी फेज ३ मध्ये घडला असून आरोपी सांगबोई कोम सेरटो या मणिपुरी IT अभियंत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना ३१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. सांगबोई कोम सेरटो या तरुणाने महिलांचे कपडे घालून कल्पतरू सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे सांगून बँक मॅनेजर सिताराम बडेजा यांच्या घरात पार्सल देण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. सिताराम बडेजा यांच्या दोन मुलांनी – गगन बडेजा आणि मधुर बडेजा – त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने आपल्या जवळील हँडगन काढून हल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र बडेजा बंधूंनी प्रसंगावधान राखत त्याला पकडले आणि घरातच असलेल्या दोरीने त्याला बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्याच्या ताब्यात दिले.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगबोई कोम सेरटो हा मूळचा मणिपूर राज्यातील असून तो एक उच्चशिक्षित IT इंजिनीअर आहे. नोकरी गेल्यामुळे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे त्याने हा धाडसी गुन्हा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तपासादरम्यान त्याच्या ताब्यातून वैध परवाना असलेली हँडगन, १९ बुलेट्स, दोन हँड ग्रेनेडसदृश्य वस्तू आणि एक कुकरी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे, या ग्रेनेडसदृश्य वस्तू प्लास्टिकच्या पाईप आणि इलेक्ट्रिक वायर वापरून तयार करण्यात आल्या होत्या, म्हणजेच जर तो पकडला गेला तर पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी ही बनावट स्फोटके वापरण्याचा त्याचा हेतू होता.

या प्रकारामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक तरुण महिलांचे कपडे घालून आणि चेहरा स्कार्फने झाकून थेट उच्चभ्रू सोसायटीत घुसतो, आणि दरोडा टाकण्याचा प्रयत्न करतो – हे ऐकूनच धक्का बसतो. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०९ (६), ३१२, ३३३ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम २५ (३), २५ (४) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाखाली गुन्हा नोंदवला आहे.

या गुन्ह्याचे स्वरूप पाहता, आरोपीने पूर्वनियोजित पद्धतीने सोसायटीत प्रवेश केला होता. महिलांचे वस्त्र, बनावट पार्सल, शस्त्रसाठा, बनावट ग्रेनेड – हे सर्व दर्शवते की, त्याच्या मनात दरोड्याचा पूर्ण कट होता. त्याने शस्त्राचा परवाना घेतलेला असला तरी त्याचा वापर गुन्ह्यासाठी केल्यामुळे त्याच्यावर गंभीर आरोप लागले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. सांगबोई कोम सेरटो याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याच्या इराद्यांमागील अन्य कारणांचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले असून, सोसायट्यांमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची पडताळणी अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed