पुणे ठरले भारतातील सर्वाधिक घरविक्री करणारे शहर | पुणे हाउसिंग रिपोर्ट 2025

0
पुणे ठरले भारतातील सर्वाधिक घरविक्री करणारे शहर | पुणे हाउसिंग रिपोर्ट 2025

पुणे ठरले भारतातील सर्वाधिक घरविक्री करणारे शहर | पुणे हाउसिंग रिपोर्ट 2025

क्रेडाई पुणे आणि सीआरई मॅट्रिक्सच्या अहवालानुसार पुणे हे देशातील सर्वाधिक किफायतशीर आणि सर्वाधिक घरविक्री करणारे शहर ठरले आहे. 2025 मध्ये मध्यम ते प्रीमियम घरांची मागणी झपाट्याने वाढली.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : क्रेडाई पुणे आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी सादर केलेल्या “पुणे हाउसिंग रिपोर्ट 2025” अहवालानुसार, पुणे शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वाधिक घरविक्री करणारे आणि किफायतशीर शहर म्हणून आपली ओळख सिद्ध केली आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत पुण्यात सुमारे 44,000 घरांचे युनिट्स विकले गेले असून त्यातून तब्बल ₹32,800 कोटींची उलाढाल झाली. ही आकडेवारी गेल्या काही वर्षांतील झपाट्याने झालेल्या विकासाला अधोरेखित करते.

अहवालानुसार, पुणे मेट्रोपोलिटन क्षेत्रात मध्यम ते प्रीमियम घरांची मागणी तिपटीने वाढली असून ₹70 लाख ते ₹2 कोटी किंमतीच्या युनिट्सना ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळतो आहे. विशेषतः हिंजवडी, खराडी, पीसीएमसी अशा आयटी व औद्योगिक भागांमध्ये घरविक्रीत मोठी वाढ झाली आहे.

2021 मध्ये पुण्यातील विक्रीपैकी 85% घरे ₹70 लाखांच्या खाली होती, परंतु 2025 मध्ये हा टक्का 60% पर्यंत घसरला आहे. याचा अर्थ ग्राहक अधिक प्रशस्त, उच्च दर्जाची घरे निवडत आहेत. बांधकाम खर्चात वाढ, जमीन महाग होणे आणि जीवनशैलीतील बदल यामुळे हा कल वाढला आहे.

पुण्याच्या तुलनेत इतर महानगरांमध्ये घरांच्या किमती प्रचंड आहेत – मुंबईत सरासरी ₹2.26 कोटी, बेंगळुरूमध्ये ₹1.61 कोटी, आणि हैदराबादमध्ये ₹1.84 कोटी आहे. पुण्यात सरासरी घराची किंमत ₹75 लाख असून त्यामुळे पुणे हे देशातील सर्वाधिक किफायतशीर महानगर मानले जाते.

अहवालात म्हटले आहे की पुणे आता केवळ किफायतशीरतेपुरते मर्यादित न राहता प्रीमियम घरांसाठी देखील एक प्रमुख बाजार बनत आहे. IT सेक्टर, स्टार्टअप्स, वेअरहाऊसिंग व ऑफिस स्पेससारख्या उद्योगांमुळे पुण्यातील घरांच्या मागणीला चालना मिळाली आहे. पुणे सध्या ऑफिस स्पेसच्या बाबतीत देशात पाचव्या स्थानी असून 100 मिलियन स्क्वेअर फूटच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

अहवालातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, 2025 मध्ये प्रकल्पांचे लॉन्चिंग काहीसे मंदावले होते, मुख्यतः पर्यावरण मंजुरीमधील विलंबामुळे. मात्र, ही प्रक्रिया आता सुलभ होत असून लवकरच नव्या प्रोजेक्ट्सला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

पुणे मेट्रो, रिंग रोड, आणि नवी मुंबई विमानतळ यांसारखे पायाभूत प्रकल्प पुण्याला देशातील सर्वोत्तम शाश्वत शहरी मॉडेल बनवण्याच्या मार्गावर नेत आहेत.

पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये स्थिरता, वाढती मागणी आणि किफायतशीरतेचा सुवर्णमध्य असल्यामुळे, हे शहर घरखरेदीसाठी देशातील सर्वोत्तम पर्याय बनले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed