पुणे पोलीस ट्रॅफिक अँप आता वाहतूक सुधारण्यासाठी पुणे पोलिसांचा डिजिटल पुढाकार
वाहतूक सुधारण्यासाठी पुणे पोलिसांचा डिजिटल पुढाकार
पुणे पोलीस ट्रॅफिक अँप आता वाहतूक सुधारण्यासाठी पुणे पोलिसांचा डिजिटल पुढाकार च्या माध्यमातून नागरीक आता थेट वाहतूक नियमभंग पोलिसांकडे रिपोर्ट करू शकणार आहेत; वाहतूक सुधारणा आणि नागरिक सहभाग एकत्र.
सायली मेमाणे
पुणे १४ जून २०२४ : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नियमभंगाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला “Pune Police Traffic App” नागरिकांचा सहभाग वाढवून वाहतूक शिस्तीची पातळी उंचावण्याचा प्रयत्न आहे. या अॅपद्वारे नागरिक आता थेट नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी फोटो किंवा व्हिडीओसह माहिती अपलोड करू शकतात. यामध्ये वाहनाचा नंबर स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. यामुळे नागरी सहभाग वाढून पोलिसांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

या अॅपचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी करण्यात आले. या वेळी चंद्रकांत पुलकुंडवार (विभागीय आयुक्त), विनायकुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), नवलकिशोर (आयुक्त, पुणे मनपा) आदी मान्यवर उपस्थित होते. अॅप डेव्हलपमेंटसाठी खासगी संगणक अभियंते नितीन काने आणि नितीन वैद्य यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
पुणे पोलीस ट्रॅफिक अँप च्या माध्यमातून नागरिक खालीलप्रमाणे वाहतूक नियमभंग पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात – फुटपाथवर पार्किंग, नो-एंट्रीतून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, मोबाईल वापर, फॅन्सी नंबर प्लेट, काळी फिल्म इत्यादी. याशिवाय वाहतुकीतील अडथळ्यांबाबतही नागरीक फोटो/व्हिडीओसह रिपोर्ट करू शकतात – जसे की खड्डे, झाडे पडणे, तेल गळती, पाणी साचणे, अपघात किंवा वाहने बिघडणे.
या माहितीच्या आधारे पुढील ४८ तासांत वाहतूक शाखा संबंधितांवर चलन जनरेट करेल किंवा तक्रारीचे निराकरण करेल. नागरिकांचा गोपनीयता कायम ठेवण्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे कुणीही कोणत्याही भीतीशिवाय माहिती देऊ शकतो.
हा उपक्रम नागरिक आणि पोलिस यांच्यातील संवाद अधिक सशक्त करतो. नियम पाळणाऱ्या पुणेकरांना ‘डिजिटल ट्रॅफिक कॉप’ होण्याची संधी या अॅपने दिली आहे. अॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यास वाहतूक समस्या कमी होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या प्रकारे, पुणे पोलीस ट्रॅफिक अँप नागरिकांसाठी फक्त एक अॅप नाही, तर वाहतूक सुधारणा आणि नागरिक सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. वाहन चालवताना फक्त स्वतःच्या सुरक्षेचाच नाही, तर इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करावा, असा संदेश पुणे पोलिसांनी या माध्यमातून दिला आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
#PunePoliceTrafficApp #PuneTraffic #वाहतूकनियंत्रण #PunePolice #TrafficApp #DigitalTrafficControl #पुणेपोलीस #CitizenReporting #TrafficRulesIndia #SmartCityInitiative
1 thought on “पुणे पोलीस ट्रॅफिक अँप आता वाहतूक सुधारण्यासाठी पुणे पोलिसांचा डिजिटल पुढाकार”