पुणे मेट्रो अपडेट: गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू, प्रवाशांसाठी दिलासा

0
15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार.

15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार.

15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार. 64 फेऱ्यांची वाढ होऊन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

सायली मेमाणे

पुणे १४ ऑगस्ट २०२५ : पुणेकरांसाठी 15 ऑगस्ट 2025 हा दिवस खास ठरणार आहे कारण पुणे मेट्रो प्रशासनाने गर्दीच्या वेळी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे पीक अवर्स म्हणजे सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत मेट्रो दर सहा मिनिटांनी धावणार आहे.

सध्या या वेळेत दर सात मिनिटांनी मेट्रो धावते, त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा कमी होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. विना गर्दीच्या वेळी मात्र मेट्रो दर दहा मिनिटांनी धावणार आहे. पुणे मेट्रोच्या पर्पल लाईन आणि अक्वा लाईन मिळून सध्या 490 फेऱ्या घेतल्या जातात. नव्या बदलामुळे आणखी 64 फेऱ्या वाढून एकूण फेऱ्यांची संख्या 554 होणार आहे.

या निर्णयासाठी मेट्रो प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत होते आणि सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्यानंतर हा निर्णय अधिकृत करण्यात आला आहे. जुलै 2025 मध्ये पुणे मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळाला असून दररोज सरासरी 1,92,000 प्रवासी मेट्रोचा वापर करत होते.

ऑगस्ट 2025 मध्ये ही संख्या वाढून 2,13,620 प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे पुणेकर मेट्रोलाच सार्वजनिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा पर्याय मानत आहेत. या बदलामुळे प्रवाशांना गर्दीतून दिलासा मिळेल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि ट्रॅफिक व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

पुणे मेट्रो प्रशासनाने नागरिकांना या नव्या सुविधेचा अधिकाधिक वापर करून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याचे आवाहन केले आहे. हा निर्णय पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि दैनंदिन प्रवास अधिक जलद व सोयीस्कर बनवेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed