पुण्यात भाजपला मोठा राजकीय बूस्ट; फुरसुंगीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

0
फुरसुंगी, उरळी देवाची परिसरात भाजपमध्ये शेकडो महिला व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

फुरसुंगी, उरळी देवाची परिसरात भाजपमध्ये शेकडो महिला व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

फुरसुंगी, उरळी देवाची परिसरात भाजपमध्ये शेकडो महिला व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; स्थानिक निवडणुकांत पक्षाला होणार फायदा.

सायली मेमाणे

पुणे ८ जुलै २०२५ : पुणे – पुण्यातील फुरसुंगी आणि उरळी देवाची परिसरात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. भाजपचे मंडल सरचिटणीस संतोष हरपळे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला असून, विविध भागांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पक्षप्रवेशात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये फुरसुंगी, उरळी देवाची, संकेत विहार, भेकराईनगर, पावर हाऊस या भागातील माजी सरपंच, माजी उपसरपंच आणि इतर स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

भाजपकडून गेल्या चार वर्षांपासून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचऱ्याचे नियोजन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांसारख्या विषयांवर पक्षाने विविध माध्यमांतून काम सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी आपल्या मनोगतातून भाजपच्या कार्यपद्धतीची आणि धोरणांची माहिती देताना जनतेशी पक्षाच्या बांधिलकीचे दर्शन घडवले.

या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनाही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या. फुरसुंगी-उरळी मंडल महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी अर्चना राजेंद्र तेलकर, उपाध्यक्षपदी रेखा युवराज काळे, चिटणीसपदी मंगल संजय शिरसाट, विभाग प्रमुखपदी राणी काकासाहेब नाळे यांची निवड करण्यात आली. याशिवाय गणेश ज्ञानोबा धोंडगे यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातून देखील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नुकतेच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला, जेव्हा माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आव्हान निर्माण झाले असून, काही माजी मंत्री आणि माजी आमदार अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महाराष्ट्रात वाढता प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा पक्षात सहभाग वाढत असून, भाजप आपली ग्वाही जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून फुरसुंगी आणि उरळी देवाची परिसरात भाजपची ताकद निश्चितच वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed