पुण्यात महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून २० लाखांचे एसी आणि झुंबर गायब

0
पुण्यात महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून २० लाखांचे एसी आणि झुंबर गायब

पुण्यात महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून २० लाखांचे एसी आणि झुंबर गायब

पुणे महापालिका आयुक्तांच्या अधिकृत बंगल्यातून तब्बल २० लाखांचे एसी आणि झुंबर गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक निधीच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सायली मेमाणे

पुणे ६ ऑगस्ट २०२५ : पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसाठी असलेल्या अधिकृत बंगल्यातून सुमारे २० लाख रुपयांचे महागडे एअर कंडिशनर आणि झुंबरे गायब झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही गोष्ट उघड झाल्यानंतर महापालिकेने नव्याने झुंबरे आणि एसी खरेदीसाठी निविदा काढली असून, लोकांच्या कराच्या पैशातून या वस्तू पुन्हा बसवण्यात येणार आहेत. ही घटना समोर येताच सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशाने किंवा दुर्लक्षामुळे ही चोरी किंवा गायब होण्याची घटना घडली, याचा शोध घेण्याऐवजी PMC प्रशासनाने थेट नवीन खरेदीकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरूनही नागरिक संताप व्यक्त करत असून, पुण्यातील प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. एकीकडे पुणे महानगरपालिका आर्थिक तुटवड्यामुळे विविध योजनांमध्ये कपात करत आहे, तर दुसरीकडे लाखोंच्या वस्तू गायब झाल्यावर त्याची भरपाई नव्या खरेदीतून केली जात आहे. विशेष म्हणजे या अधिकृत बंगल्यात पूर्वीच्या आयुक्तांनी राहिल्यानंतर काही काळ हा बंगला रिकामा होता. त्या दरम्यान ही मालमत्ता कुठे गेली, याचा ठोस तपास झालेला नाही. PMC ने एका ठेकेदारामार्फत हिशेबपत्रात या वस्तू खरेदी करून बसवल्याची नोंद आहे, परंतु त्या वस्तू आता प्रत्यक्षात तिथे नाहीत. यामुळे हिशोब, तपासणी आणि जबाबदारी निश्चित न करता PMC ने सरळपणे नवीन खरेदी करून प्रकरणावर पडदा टाकल्याचे चित्र आहे. सध्या या खरेदीच्या निविदेची प्रक्रिया सुरू असून पुन्हा एकदा २० लाखांपेक्षा अधिक खर्च करून तेच सामान पुन्हा बसवले जाणार आहे. ही गोष्ट उघडकीस आल्यावर नागरिक आणि कार्यकर्ते PMC प्रशासनावर तीव्र टीका करत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा कोसळत असताना आयुक्तांच्या बंगल्यासाठी होणारा लाखोंचा खर्च नागरिकांच्या रोषाचे कारण बनला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed