पुण्यात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

0
पुण्यात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पुण्यात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड आणि नातू बाग गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; १८१ हून अधिक नागरिकांचा सहभाग.

सायली मेमाणे

पुणे २७ जून २०२५ : रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड आणि नातू बाग गणेश मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ जून २०२५ रोजी वरदश्री सभागृह, बाजीराव रस्ता येथे महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

सदर आरोग्य शिबिरामध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकांकडून तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रक्त तपासणी, हाडांची घनता तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच आरोग्य सल्ला देण्यात आला. एकूण १८१ नागरिकांनी रक्त व आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर २०३ नागरिकांनी हाड तपासणी केली. विशेषतः डोळ्यांच्या तपासणीसाठी २२५ नागरिकांनी नोंद केली. त्यापैकी १२३ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यात अधिक महत्त्वाचे म्हणजे, १९ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांच्यावर एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याशिवाय, १० रुग्णांमध्ये इतर डोळ्यांच्या समस्यांचे निदान झाले असून त्यांच्यावरही उपचार करण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी विटेस्को टेक्नॉलॉजिज या कंपनीचे अर्थसहाय्य लाभले. शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोडकडून अध्यक्ष अभय देवरे, अवंती देवरे, आरती भट, रेणुका पंडित, मिलिंद बिवलकर, नितीन चावरे, श्रीकांत पाटणकर आणि सुनील जाधव यांची उपस्थिती लाभली. तर नातू बाग गणेश मंडळ ट्रस्टकडून प्रमोद कोंढरे, निरंजन भगत, अमित कंक यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजूंना मोफत व सवलतीच्या दरात वैद्यकीय तपासण्या आणि उपाययोजना मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले. अशा उपक्रमांतून समाजामध्ये आरोग्य जागरूकता निर्माण होते, हे निश्चित.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed