पुण्यात खंडणी व मोक्का गुन्ह्यातील ११ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट ४ ने ठोकल्या बेड्या. आरोपीवर गंभीर कलमांसह खटला दाखल असून तपास सुरू.

0
मोक्का गुन्ह्यातील 11 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी विमानतळ परिसरातून पोलिसांच्या जाळ्यात

मोक्का गुन्ह्यातील 11 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी विमानतळ परिसरातून पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यात ₹खंडणी व मोक्का गुन्ह्यातील 11 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-4 ने ठोकल्या बेड्या .आरोपीवर गंभीर कलमांसह खटला दाखल असून तपास सुरू आहे.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : 📰 मोक्का गुन्ह्यातील 11 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी विमानतळ परिसरातून पोलिसांच्या जाळ्यात
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-4 ने खंडणी, गंभीर मारहाण, तोडफोड आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत नोंदवलेल्या गंभीर गुन्ह्यातील 11 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 481/2024 अन्वये पाहिजे असलेला आरोपी बाबा रघुनाथ सरोदे (वय 31, रा. एसआरए बिल्डिंग, विमाननगर, पुणे) याला डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे मिळून आला. पोलिसांच्या तपास पथकाने मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-4 चे पोलीस हवालदार विनोद महाजन आणि पोलीस नाईक नागेश सिंग कुवर हे आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी बाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉस्पिटल परिसरात तत्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 308(4), 189(2), 191(2), 191(3), 190, 352, 351(3), भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), गुन्हेगारी कायदा कलम 07 आणि मोक्का कायदा 1999 अंतर्गत कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मागील अनेक महिन्यांपासून आरोपी फरार होता आणि पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

गुन्हे शाखा युनिट-4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. आरोपीचा तपास सुरू असून त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर आरोपींची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed