“प्रभाग ०९ मध्ये विकासाची गंगा येणार” – लहू बालवडकर यांच्यासह भाजप उमेदवारांचा विकासाभिमुख वचननामा जाहीर

0
“प्रभाग ०९ मध्ये विकासाची गंगा येणार” – लहू बालवडकर यांच्यासह भाजप उमेदवारांचा विकासाभिमुख वचननामा जाहीर

“प्रभाग ०९ मध्ये विकासाची गंगा येणार” – लहू बालवडकर यांच्यासह भाजप उमेदवारांचा विकासाभिमुख वचननामा जाहीर


पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ०९ मध्ये भाजप उमेदवारांनी विकासाभिमुख वचननामा जाहीर करत सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला.

पुणे ११ जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद दिला. सभेच्या निमित्ताने प्रभाग ०९ साठीचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख वचननामा अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.

हा वचननामा तयार करताना प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या, विकासाच्या गरजा आणि भविष्यातील आव्हानांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, नागरिकांच्या अपेक्षा व मागण्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या आहेत. विकास आराखडा केवळ कागदापुरता न राहता तो प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

यावेळी उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ठाम भूमिका मांडली. “प्रभाग ०९ मध्ये विकासाची गंगा आणायची असेल, तर भारतीय जनता पार्टीला निवडून देणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेत महापौरही भाजपचाच असेल, त्यामुळे शहरासह प्रभागाचा विकास अधिक गतीने साध्य होईल,” असे त्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वचननाम्यात सुरक्षित व अपघातमुक्त रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, मल्टीलेव्हल पार्किंग, अतिक्रमणमुक्त फूटपाथ यांचा समावेश आहे. तसेच स्वच्छ, झिरो-वेस्ट आणि पर्यावरणपूरक प्रभाग घडवण्यासाठी आधुनिक कचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण केंद्रे, वृक्षारोपण व हरित पट्टे विकसित करण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी क्विक रिस्पॉन्स सिस्टीम, २४ तास कार्यरत जनसेवा कार्यालये, दर तीन महिन्यांनी जनसंवाद सभा, तसेच सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. रस्ते कामांपूर्वी PMC, MSEB, मेट्रो आदी यंत्रणांमध्ये समन्वय साधून टिकाऊ व दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

महिला सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, वॉकिंग ट्रॅक, तरुणांसाठी क्रीडा संकुले, ओपन जिम, वाचनालये, बेबी डे केअर सेंटर्स, पेट्स केअर सेंटर्स, बसस्टॉप नूतनीकरण आणि ड्रग्समुक्त प्रभाग या मुद्द्यांनाही वचननाम्यात महत्त्व देण्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-महाळुंगे परिसरासाठी स्वतंत्र विशेष विकास आराखडाही जाहीर करण्यात आला.

सभेच्या शेवटी नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या विकास संकल्पाला जोरदार पाठिंबा दिला. निवडणुकीनंतर तातडीने विकासकामांना सुरुवात करून पुढील पाच वर्षे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *