भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रशियासोबत कराराच्या तयारीत

0
डोनाल्ड ट्रम्प यांचा फाटला बुरखा; भारतावर टॅरिफ तर रशियासोबत कराराची तयारी

डोनाल्ड ट्रम्प यांचा फाटला बुरखा; भारतावर टॅरिफ तर रशियासोबत कराराची तयारी

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावले, रशियाकडून तेल खरेदीवरून दबाव आणला. मात्र, दुसरीकडे तेच ट्रम्प रशियासोबत ऊर्जा करार करण्यास उत्सुक असल्याचे वृत्त समोर आले.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ : वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ लावून धक्का दिला आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताला त्यांनी जबाबदार धरत थेट 50 टक्के टॅरिफ लागू केले. मात्र, दुसरीकडे हेच ट्रम्प रशियासोबत मोठा एनर्जी करार करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त बाहेर आले आहे.

ट्रम्प यांनी अलीकडेच आरोप केला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्याच पैशातून रशिया युक्रेनविरुद्ध युद्ध लढत आहे. भारताने अमेरिकेच्या धमक्या न जुमानता रशियासोबत करार सुरू ठेवले. त्यानंतर अमेरिकेने थेट 50% टॅरिफ भारतावर लादले.

याचवेळी अमेरिका स्वतः रशियासोबत मोठा ऊर्जा करार करण्यास उत्सुक आहे. युद्धावर तोडगा निघाला नसतानाही अमेरिकन कंपन्या रशियाच्या अणुऊर्जेवरील जहाजे व ऊर्जा प्रकल्पांत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावल्याचे जाहीर होताच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून आपला पाठिंबा दर्शवला. रशियाने भारताला स्पष्ट केले की, या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर ते भारतासोबत ठामपणे उभे राहतील.

भारतावर दबाव आणत असताना स्वतः रशियासोबत करार करण्याचा प्रयत्न केल्याने ट्रम्प यांचा “फाटलेला बुरखा” आता उघडकीस आला आहे. अमेरिकेने युक्रेनला शांततेसाठी राजी करून रशियासोबत ऊर्जा करार साध्य करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतरही रशियाकडून समर्थन मिळणे भारतासाठी सकारात्मक बाब मानली जाते. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिका-भारत संबंधांवर ताण वाढणार की नवे समीकरण तयार होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed