मनसेचा थाळीनाद मोर्चा | घणसोलीतील रस्ते, पाणी, डेंग्यू, अतिक्रमणावर संताप

0
मनसेचा थाळीनाद मोर्चा: घणसोली वॉर्ड ऑफिसवर नागरी समस्यांवरून संतापाचा उद्रेक

मनसेचा थाळीनाद मोर्चा: घणसोली वॉर्ड ऑफिसवर नागरी समस्यांवरून संतापाचा उद्रेक

नवी मुंबईतील घणसोली वॉर्डमधील नागरी समस्यांवर मनसेचा थाळीनाद मोर्चा! खराब रस्ते, दूषित पाणी, मलेरिया-डेंग्यूची साथ, अतिक्रमणाविरोधात जोरदार आंदोलन. संपूर्ण माहिती वाचा.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : नवी मुंबई | घणसोली परिसरातील नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) “थाळीनाद मोर्चा” काढून पालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

नवी मुंबईतील घणसोली विभागात नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून विविध नागरी समस्यांचा सामना करत आहेत. प्रमुख समस्यांमध्ये:

  • खराब आणि खड्डेमय रस्ते व पदपथ
  • पावसाळ्यात वाढलेली मलेरिया व डेंग्यूची साथ
  • अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या गल्लीबोळांची अवस्था
  • अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा
  • उपेक्षित उद्याने आणि हरितक्षेत्रांचा ऱ्हास
  • सार्वजनिक ठिकाणी पडलेला घनकचरा आणि दुर्गंधी
  • घणसोलीतून वाहणारा दुर्गंधीयुक्त मोठा नाला

या सर्व समस्यांबाबत पालिका प्रशासनाला जागं करण्यासाठी आज मनसेने घणसोली वॉर्ड कार्यालयावर जोरदार थाळीनाद मोर्चा काढला. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता. यामध्ये कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवत निषेध व्यक्त केला.

मोर्चा दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी वॉर्ड अधिकारी आणि महापालिकेच्या संबंधित विभागांना घेराव घालून प्रश्न विचारले. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जोरदारपणे मांडण्यात आली.

गजानन काळे यांनी यावेळी सांगितले की,

“घणसोलीत नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आम्ही वेळोवेळी निवेदनं दिली, परंतु प्रशासन झोपेत आहे. आता थाळीनाद करून आम्ही त्यांना जागं करतो आहोत.”

या मोर्चामध्ये मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये मनसेच्या या कृतीमुळे समाधानाचे वातावरण आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *