महानगरपालिका निवडणूक : आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार ठाम; एकमत न झाल्यास पर्याय खुला – शशिकांत शिंदे

0
महानगरपालिका निवडणूक : आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार ठाम; एकमत न झाल्यास पर्याय खुला – शशिकांत शिंदे

महानगरपालिका निवडणूक : आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार ठाम; एकमत न झाल्यास पर्याय खुला – शशिकांत शिंदे


महानगरपालिका निवडणुकांबाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची स्पष्ट भूमिका. महाविकास आघाडी प्राधान्य, मात्र एकमत न झाल्यास पर्यायाचा विचार – शशिकांत शिंदे.

पुणे २० डिसेंबर २०२५ : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि आघाडीच्या धोरणावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यावर आमची प्राथमिक भूमिका ठाम असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्यासच दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर भूमिका मांडली. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेससोबत एक-दोन फेऱ्यांच्या चर्चा झाल्या असून, त्या चर्चांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, अंतिम धोरणात्मक निर्णय हा राज्यस्तरावरच घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत एकमताने निर्णय घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष, प्रतिनिधी आणि कोअर कमिटी सदस्यांशी चर्चा करण्यात आली आहे. या सर्वांना शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडीबाबत सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, शनिवारच्या संध्याकाळपर्यंत हा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील दिशा ठरवली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

अजित पवार गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी हाच पहिला आणि प्राधान्याचा पर्याय आहे. जर आघाडीमध्ये एकमत झाले नाही, तरच दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडमधील शहराध्यक्षांनी अजित पवार यांची भेट घेतल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, आघाडीबाबतचा निर्णय जिल्हास्तरावर होत नाही, तर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि स्वतः शशिकांत शिंदे हे राज्यस्तरावर अंतिम निर्णय घेतील.

महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते. त्यामुळे आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले. काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे की प्रभाग आणि वार्ड रचनेनुसार योग्य निर्णय न घेतल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, तर दुसरा प्रवाह महाविकास आघाडी सोबत जाण्यास ठाम आहे.

महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही उमेदवार यादी जाहीर केली जाणार नाही, असे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, २३ तारखेला आघाडीबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्या ठिकाणी संबंधित पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील. महाविकास आघाडी किंवा अजित पवार गटासोबत जाणे यापैकी कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरेल, याचा वस्तुनिष्ठ विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *