मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटचा आत्महत्येपूर्वीचा भावनिक पत्र वाचून अश्रू अनावर; ब्लॅकमेलच्या छायेखाली संपलं आयुष्य

0
मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटचा आत्महत्येपूर्वीचा भावनिक पत्र वाचून अश्रू अनावर

मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटचा आत्महत्येपूर्वीचा भावनिक पत्र वाचून अश्रू अनावर

मुंबईतील 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे यांनी ब्लॅकमेलमुळे आत्महत्या केली. विष प्राशनापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईसाठी भावनिक निरोप व आरोपींची नावे उघड.

सायली मेमाणे

मुंबई १० जुलै २०२५ : मुंबई : “आई, मला माफ कर, मी चांगला मुलगा नाही” – हे वाक्य वाचून कोणाचेही काळीज हेलावून जाईल. मुंबईतील एका 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट राज लिला मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आईबद्दलचे शब्द आणि आयुष्य संपवण्यामागील कारणं उघड केली आहेत. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीच्या आड ब्लॅकमेलचा गंभीर खेळ खेळला गेला आणि शेवटी त्याचं भीषण अपघातात रूपांतर झालं.

राज मोरे यांनी सांताक्रूझमधील त्यांच्या राहत्या घरी विषारी पदार्थ प्राशन करून आपलं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी तीन चिठ्ठ्या लिहिल्या, ज्यात एक त्यांच्या आईसाठी, एक त्यांच्या फर्मसाठी आणि तिसरीत दोघा आरोपींची नावे नमूद केली आहेत.

राज यांनी त्यांच्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिलं आहे की, राहुल परवानी आणि सबा कुरेशी या दोन व्यक्तींनी त्यांना मानसिक त्रास दिला, ब्लॅकमेल केलं आणि प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल ३ कोटी रुपये व एक आलिशान कार हिसकावून घेतली. त्यांच्या मते, राहुल आणि सबाने त्यांच्या खात्यांमधून पैसे स्वतःच्या खात्यात वळवायला भाग पाडले.

राज यांची इंस्टाग्रामवरून राहुल व सबाशी ओळख झाली होती. त्यांना माहिती मिळाली की, राज शेअर बाजारात गुंतवणूक करतात व त्यांना मोठा पगार मिळतो. यामुळे त्यांनी राजवर ब्लॅकमेलची साखळी सुरू केली.

राजच्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी अत्यंत भावनिक असून, “माफ कर आई, मी तुझा चांगला मुलगा होऊ शकलो नाही… मला वाईट वाटतंय…” अशा शब्दांनी सुरुवात होते. त्यांनी त्यांच्या विमा पॉलिसी व खात्यांची माहिती देऊन ते पैसे आईपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे.

राजने दुसऱ्या चिठ्ठीत थेट दोघा आरोपींची नावं घेत, “माझ्या मृत्यूला हेच दोघं जबाबदार आहेत,” असं लिहिलं. पोलिसांनी यानंतर राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *