मुंबई कबुतरखाना वादात हाणामारी: वृद्ध व मुलीला लोखंडी रॉडने मारहाण, पोलिसांत गुन्हा
मुंबई कबुतरखाना वाद: वृद्ध आणि त्याच्या मुलीवर लोखंडी रॉडने हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई मीरारोडजवळील डीबी ओझोन इमारतीत कबुतरांना दाणे टाकू नका म्हटल्याने वृद्ध व त्याच्या मुलीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. काशीमीरा पोलिसांत गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ :मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील कबुतरखाने हटवले जात असून, सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मीरारोडजवळील ठाकूर मॉल परिसरातील DB Ozone इमारतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ कबुतरांना दाणे टाकू नका असे सांगितल्यामुळे एका वृद्ध नागरिकासह त्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली.
ही घटना रविवारी घडली. महेंद्र पटेल (वय 69) हे इमारतीच्या परिसरात गेले असताना त्यांनी अशा व्यास (वय 56) यांना कबुतरांना दाणे टाकू नका, असे सांगितले. या वादातून व्यास यांनी शिवीगाळ केली. हा प्रकार ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमल (वय 46) खाली आल्यावर व्यास यांनी तिलाही शिवीगाळ केली.
याच दरम्यान, व्यास यांच्या ओळखीचा सोमेश अग्निहोत्री दोन अनोळखी व्यक्तींना घेऊन आला आणि त्यांनी थेट प्रेमल यांच्यावर हल्ला चढवला. एका व्यक्तीने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर दुसऱ्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. महेंद्र पटेल यांनाही हाताने मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर काशीमीरा पोलिस ठाण्यात अशा व्यास, सोमेश अग्निहोत्री आणि दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे