मोदींच्या कॅनडा दौऱ्याआधी खलिस्तान्यांविरोधात ऐतिहासिक कारवाई

1
मोदींच्या कॅनडा दौऱ्याआधी खलिस्तान्यांविरोधात ऐतिहासिक कारवाई

मोदींच्या कॅनडा दौऱ्याआधी खलिस्तान्यांविरोधात ऐतिहासिक कारवाई

India Canada Relation मध्ये मोठा बदल, मोदींच्या G7 परिषद दौऱ्याआधी कॅनडाने खलिस्तान्यांविरोधात Project Pelican ऑपरेशन राबवून भारतविरोधी नेटवर्कचा पर्दाफाश केला.

सायली मेमाणे

१२ जून २०२५ : India Canada Relation या दोन देशांमधील संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. गेल्या काही वर्षांत खलिस्तानविषयक तणाव, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि भारतविरोधी कारवायांमुळे या संबंधांवर सावली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅनडा दौऱ्याआधी घडलेली एक घटना या तणावपूर्ण संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण वळण घेऊन आली आहे. कॅनडात Project Pelican नावाच्या ऑपरेशन अंतर्गत खलिस्तान समर्थकांवर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत कॅनडाच्या पोलिसांनी ४७९ किलो कोकेन जप्त केली असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य ४७.९ मिलियन डॉलर्स इतकी आहे. हे कॅनडामधील आतापर्यंतचे सर्वात मोठे ड्रग जप्तीचे ऑपरेशन ठरले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ९ जणांना अटक केली आहे, त्यापैकी ७ भारतीय वंशाचे आहेत. या गटाचा संबंध मॅक्सिकन ड्रग कार्टेल व अमेरिकन ड्रग वितरकांशी असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. हा गट कॅनडा आणि अमेरिका दरम्यानच्या ट्रकिंग रूटचा वापर करत होता. मिळवलेला पैसा भारतविरोधी आंदोलन, जनमतसंग्रह आणि शस्त्रास्त्र खरेदीसाठी वापरला जात होता.

India Canada Relation मधील खलिस्तान्यांच्या आर्थिक नेटवर्कमध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI सक्रीय असल्याचे गुप्तचर संस्थांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अफगाण हेरॉइन व मॅक्सिकन कोकेनच्या तस्करीसाठी कॅनडामधील खलिस्तानी गटांचा वापर होत असल्याचा संशय आहे. या नेटवर्कवर Project Pelican अंतर्गत कारवाई करताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – साजगिथ योगेन्द्रराजा, मनप्रीत सिंह, अरविंदर पोवार, करमजीत सिंह, गुरतेज सिंह, सरताज सिंह, शिव ओंकार सिंह, फिलिप टेप आणि हाओ टॉमी हुइन्ह.

या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेसाठी कॅनडाच्या कनानास्किस शहरात जात आहेत. मोदींनी सोशल मीडियावरून कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि शिखर परिषदेच्या निमंत्रणाबद्दल आभार मानले. India Canada Relation मध्ये सुधारणा घडवण्यासाठी दोघांमधील प्रस्तावित स्वतंत्र भेटीची शक्यता असून त्यात खलिस्तान्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी भारत करू शकतो.

पूर्व पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात खलिस्तानी गटांना अप्रत्यक्ष पाठींबा मिळाल्यामुळे India Canada Relation तणावपूर्ण बनले होते. ट्रूडोंनी भारतविरोधी वक्तव्ये केली, खलिस्तानी नेत्या निज्जरच्या समर्थनार्थ बोलले आणि भारतावर पुराव्यांशिवाय गंभीर आरोप केले. यामुळे भारताने तीव्र निषेध केला होता आणि कूटनैतिक संबंधांवर त्याचा परिणाम झाला. त्याच धोरणांची किंमत ट्रूडोंना सत्ता गमावून चुकवावी लागली.

India Canada Relation मध्ये आता नव्या राजकीय नेतृत्वामुळे एक सकारात्मक वळण दिसत आहे. Project Pelican ऑपरेशनने कॅनडात भारतविरोधी नेटवर्कविरुद्ध कारवाईची दिशा दिली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये नव्या सहकार्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा द्विपक्षीय संबंधांसाठी निर्णायक ठरू शकतो. G7 परिषदेत सहभागी होण्याबरोबरच खलिस्तान मुद्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडून भारत आपली सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचा मुद्दा अधिक ठामपणे जागतिक व्यासपीठावर मांडू शकतो.

India Canada Relation मधील हे पाऊल भविष्यातील आर्थिक, कूटनैतिक आणि सामरिक सहकार्याचे नवे मार्ग खुले करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दोन्ही देशांचे व्यापारी संबंध, तंत्रज्ञान सहकार्य, शिक्षण आणि प्रवास व्यवस्था या क्षेत्रांतही पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे. Project Pelican ऑपरेशन हे या नव्या सुरुवातीचं प्रतीक ठरतं आहे.

Follow us On Our Social media Handles :

Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
Youtube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter – https://x.com/NewsDotz

To Join Our WhatsApp Group 👇👇
https://chat.whatsapp.com/EHwaykKHtPm75rE9dTLEgw

1 thought on “मोदींच्या कॅनडा दौऱ्याआधी खलिस्तान्यांविरोधात ऐतिहासिक कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *