रोहित शर्मा ने घेतली 4.57 कोटींची Lamborghini Urus SE, 3015 नंबरमागचं खास रहस्य

0
Rohit Sharma ने घेतली 4.57 कोटींची Lamborghini Urus SE, 3015 नंबरमागचं खास रहस्य

Rohit Sharma ने घेतली 4.57 कोटींची Lamborghini Urus SE, 3015 नंबरमागचं खास रहस्य

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यांनी 4.57 कोटींची लाल Lamborghini Urus SE खरेदी केली. गाडीचा 3015 नंबर त्याच्या मुलांच्या वाढदिवसाशी आणि जर्सी नंबर 45 शी जोडलेला आहे.

सायली मेमाणे

पुणे ११ ऑगस्ट २०२५ : भारतीय क्रिकेट संघाचा वन-डे कॅप्टन आणि जगातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याची नवीन लक्झरी कार Lamborghini Urus SE. लाल रंगाची ही आकर्षक कार नुकतीच रोहितला डिलिव्हर झाली असून तिची किंमत ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या नवीन गाडीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4.57 कोटी रुपये आहे. Lamborghini Urus SE ही केवळ लक्झरी कार नसून ती दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. यात 800 हॉर्सपॉवर आणि 950 एनएम टॉर्क आहे. ही कार फक्त 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग पकडते, जे सुपरकारच्या श्रेणीत मोडते. रोहित शर्मा याआधीही Lamborghini Urus चे मालक होते, मात्र त्यांनी त्यांची जुनी कार एका Dream11 स्पर्धेतील विजेत्याला दिल्याने आता त्यांनी नवीन मॉडेलची खरेदी केली आहे.

रोहितच्या नवीन कारचा नंबर 3015 पाहून चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले. पण हा नंबर निवडण्यामागे एक भावनिक कारण आहे. 30 हा नंबर त्याच्या मुलगी समायरा हिच्या जन्मतारखेशी (30 डिसेंबर) संबंधित आहे, तर 15 हा नंबर त्याच्या मुलगा अहानच्या जन्मतारखेशी (15 नोव्हेंबर) जोडलेला आहे. आणखी खास म्हणजे 3015 मधील अंकांची बेरीज 45 येते, जो रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर आहे. त्यामुळे हा नंबर त्याच्यासाठी अधिक खास बनतो.

रोहित शर्मा केवळ क्रिकेटमध्येच नाही तर लक्झरी कार कलेक्शनमध्येही ओळखला जातो. त्याच्या गॅरेजमध्ये बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीजसारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. Lamborghini Urus SE ने त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी एक रत्नाची भर पडली आहे. सध्या रोहित भारताच्या वन-डे टीमचे नेतृत्व करत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वन-डे करिअरच्या भविष्यासंदर्भात चर्चेला उधाण आले असले तरी बीसीसीआय याबाबत कोणताही घाईचा निर्णय घेणार नाही. ऑगस्टमध्ये नियोजित बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर टीम इंडियाची पुढील वन-डे मालिका 19 ते 25 ऑक्टोबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याआधी विराट आणि रोहित यांना भारत ‘अ’ संघाकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराट आणि रोहितच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये मिळून 83 शतके आणि 25,000 पेक्षा जास्त धावा आहेत. मात्र, 2027 च्या वर्ल्ड कपवेळी त्यांचे वय अनुक्रमे 40 आणि 39 वर्षे असेल, त्यामुळे ते तोपर्यंत खेळतील का हा प्रश्न कायम आहे.

रोहित शर्मा यांची Lamborghini Urus SE खरेदी ही केवळ क्रिकेट चाहत्यांसाठीच नव्हे तर कारप्रेमींसाठीही चर्चेचा विषय ठरली आहे. 4.57 कोटींच्या या सुपरकारमागील 3015 नंबरचे भावनिक महत्त्व त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू दाखवते. मैदानावर दमदार खेळ करणारा हा कॅप्टन मैदानाबाहेरही आपल्या स्टाईल आणि लक्झरी लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *