लोहगावमध्ये १२ किलो गांज्यासह इसम अटकेत, विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0
लोहगावमध्ये १२ किलो गांज्यासह इसम अटकेत, विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लोहगावमध्ये १२ किलो गांज्यासह इसम अटकेत, विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे (दि. २२ जून २०२५):

विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोहगावमधून गांज्याची तस्करी करणाऱ्या इसमाला अटक केली. आरोपीकडून १२ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ₹३ लाख इतकी आहे.

विमानतळ पोलीस स्टेशन तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, कर्मभूमीनगर, लोहगाव येथे एक इसम गांजासह थांबलेला आहे. तपास पथकाने तत्काळ सापळा रचत सदर इसमाला अटक केली. त्याचे नाव अखिलेश गरीब मंडल (वय ३४) असे असून तो कर्मभूमीनगर, काळभोर वस्ती, लोहगाव येथे राहणारा आहे.

अखिलेशच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये १२ किलो गांजा सापडला. त्याच्या विरोधात विमानतळ पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व), मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त झोन ४, मा. श्री. हिम्मत जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड , पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे,ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे,लालू कऱ्हे,शंकर वाघुले,यंपाळे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

अजुन वाचा : पुणे

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *