शिरसाटांच्या बेडरूममध्ये नोटांनी भरलेली बॅग? व्हायरल व्हिडीओवरून खळबळ, आयकर विभागाची नोटीस

0
शिरसाटांच्या बेडरूममध्ये नोटांनी भरलेली बॅग? व्हायरल व्हिडीओवरून खळबळ, आयकर विभागाची नोटीस

शिरसाटांच्या बेडरूममध्ये नोटांनी भरलेली बॅग? व्हायरल व्हिडीओवरून खळबळ, आयकर विभागाची नोटीस

संजय शिरसाट यांचा नोटांच्या बॅगसह व्हिडीओ व्हायरल; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ, तर शिरसाटांनी परखड प्रत्युत्तर दिलं. आयकर विभागानेही पाठवली नोटीस.

सायली मेमाणे

पुणे ११ जुलै २०२५ : शिरसाटांच्या बेडरूममध्ये नोटांनी भरलेली बॅग आलीच कशी? व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वाद, आयकर विभागाची नोटीस

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आयकर विभागाने त्यांच्या निवडणूक शपथपत्रातील संपत्तीच्या तफावतीवरून नोटीस बजावली आहे. त्यात भर म्हणून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओत शिरसाट यांच्या बेडरूममध्ये नोटांनी भरलेली बॅग दिसत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना सुरुवात झाली. संजय शिरसाट बेडवर बसलेले दिसतात आणि त्यांच्या शेजारी एक बॅग ठेवलेली आहे, ज्यामध्ये नोटांचे बंडल स्पष्टपणे दिसत आहेत. हे नेमकं पैसे कुठून आले, यावर विविध राजकीय नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला, तर शिरसाटांनीही प्रतिउत्तरात राऊतांवर सडकून टीका केली. “संजय राऊत हे उठसूट एकनाथ शिंदेंवरच बोलत असतात. त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, अशा माणसासाठी वेळ वाया घालवू नये,” असे शिरसाट म्हणाले.

दरम्यान, आयकर विभागाने शिरसाट यांना पाठवलेल्या नोटिशीत निवडणूक शपथपत्रात नमूद केलेली संपत्ती आणि प्रत्यक्ष मिळकत यामधील तफावतबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधील ‘व्हिटस् हॉटेल’ प्रकरणातही शिरसाट अडचणीत आहेत. त्यामुळे शिंदे गटावरही दबाव वाढला आहे.

हे प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून विरोधकांकडून चौकशीची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी वाढण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *