सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ८ वाघांचे स्थलांतर, प्रजनन वाढीसाठी मोठा पाऊल

0
व्याघ्र

व्याघ्र

महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतील आठ वाघांचे स्थलांतर करण्याचा केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय.

महाराष्ट्र |१७ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधून एकूण आठ वाघ सह्याद्रीत स्थलांतरित केले जाणार आहेत. या आठ वाघांमध्ये पाच मादी वाघीण आणि तीन नर वाघांचा समावेश आहे.

सह्याद्री प्रकल्पात आतापर्यंत फक्त तीन नर वाघ होते आणि मादींचा अभाव असल्याने प्रजनन प्रक्रिया प्रभावित होत होती. आता मादी वाघीणांचा समावेश झाल्याने प्रजननाची क्षमता वाढेल आणि वाघांची संख्या सुरक्षित मार्गाने वाढविण्यात येईल, असा वनविभागाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतील आठ वाघांचे स्थलांतर करण्याचा केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय.
महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतील आठ वाघांचे स्थलांतर करण्याचा केंद्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय.

केंद्र सरकारने या स्थलांतरासाठी आवश्यक परवानगी दिली असून, महाराष्ट्र वन विभागाने वाघांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. हा उपक्रम केवळ वाघसंख्येत वाढ करणार नाही, तर सह्याद्री परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यातही मदत करेल.

सह्याद्री प्रकल्पात हे स्थलांतर पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात येणार असून, स्थानिक लोकसंघटनांना वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूक करण्यास ही उपक्रम मदत करेल. वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यास देखील या उपक्रमातून मोठा हातभार लागेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *