सावित्रीबाई फुले विद्यापीठात शाहू महाराज जयंती वैचारिक पद्धतीने साजरी

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती वैचारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती वैचारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे, दि. २६ जून २०२५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती वैचारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रशीक वेल्फेअर फाऊंडेशन व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठ समुदायात मोठा प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. पंजाबराव वानखेडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. “राजर्षी शाहू महाराज : सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ” या विषयावर त्यांनी सखोल आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार आठवत सांगितले की, “महापुरुषांच्या जयंती वैचारिक पद्धतीने साजऱ्या झाल्या पाहिजेत,” आणि विद्यापीठ हे त्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी कौतुक केले.

विद्यापीठात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव होते. त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्रांतीचा मागोवा घेत, विद्यार्थी हेच त्यांच्या विचारांचे खरे संवाहक असल्याचे अधोरेखित केले.

प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा देत, विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित काम करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भद्रे यांनी, प्रास्ताविक राहुल ससाणे यांनी तर आभार प्रदर्शन रोहित भामरे यांनी केले.
प्रशिक वेल्फेअर फाउंडेशन चे पदाधिकारी स्नेहल डोंगरे, अभिषेक शेलकर, तर विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती चे मयुर जावळे, निखील सिद्धगणेश आदी उपस्थित होते. कार्यक्रम सी. व्ही. रमण हॉल, भौतिकशास्त्र विभाग येथे पार पडला.

“विद्यापीठांमध्ये महापुरुषांची जयंती ही वैचारिक पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही प्रशीक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून केला आहे. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त माजी IAS अधिकारी व विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यापुढे देखील आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, आणि पर्यावरण पुरक काम करणार आहोत.”

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed