हर्षित राणाची कामगिरी आशिया कपसाठी संघात अपुरी; जयस्वालला देखील संधी नाही
हर्षित राणाची कामगिरी आशिया कपसाठी संघात अपुरी; जयस्वालला देखील संधी नाही
आशिया कप २०२५साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली; हर्षित राणा आणि यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळाले नाही, बीसीसीआयवर निवडीसंबंधी प्रश्न निर्माण.
सायली मेमाणे
पुणे २१ ऑगस्ट २०२५ : मुंबई: आशिया कप २०२५साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. यावेळी काही खेळाडूंना संघात स्थान न मिळाल्यामुळे निवडीवर वादविवाद जोर धरला आहे. विशेषतः हर्षित राणाची कामगिरी संघात समावेश होण्यासाठी पुरेशी नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली असून, त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफीमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यानंतरही यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळाले नाही. या निवडीमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
निवडीवरील वादविवाद सोशल मीडियावरही उठून दिसत आहेत. क्रिकेट चाहत्यांनी आपले मत व्यक्त करत संघाच्या निवडीवर चिंता व्यक्त केली आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी असेल, हे आता सर्वांच्या लक्षात आहे.