हायफाय लुक पण लोकलचं तिकीट नाही! स्टेशनवर तरुणीचा तमाशा झाला व्हायरल

0
हायफाय लूक, पण विनातिकीट प्रवास; रेल्वे स्थानकात महिलेचा तमाशा सोशल मीडियावर व्हायरल

हायफाय लूक, पण विनातिकीट प्रवास; रेल्वे स्थानकात महिलेचा तमाशा सोशल मीडियावर व्हायरल

हायफाय ड्रेसिंग केलेली तरुणी मुंबई लोकलमध्ये विनातिकीट पकडली गेल्यावर स्टेशनवरच गोंधळ घालू लागली. इंग्रजीत टीसीशी हुज्जत घालताना तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सायली मेमाणे

पुणे ५ ऑगस्ट २०२५ : मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध मोहिमा राबवत असते. अशा मोहिमांमध्ये अनेक प्रवासी पकडले जातात आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात दिसायला हायफाय असणाऱ्या एका महिलेने विनातिकीट प्रवास केला असून पकडल्यावर रेल्वे स्थानकातच मोठा तमाशा घातला आहे.

व्हिडीओमध्ये दिसणारी महिला कॉर्पोरेट लुकमध्ये असून तिचं ड्रेसिंग एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे आहे. ती लोकलमधून उतरल्यावर फूटओव्हर ब्रिजवर जात असताना टीसीने तिला अडवले. त्याने तिकीट विचारल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. “माझी कंडीशन बघा, मला घाई आहे,” असं म्हणत तिने तिकीट दाखवण्यास नकार दिला. पण टीसीने तिचं बहाणं ऐकून न घेता पुन्हा तिकीट मागितलं.

या परिस्थितीत महिलेने आपला ‘हुकमी एक्का’ वापरला. तिने रेल्वे स्थानकातच मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. “मी किती सभ्य आहे”, “माझं बघा कसं ड्रेसिंग आहे” असं इंग्रजीत बोलत ती स्वतःचं समर्थन करत होती. टीसीनेही इंग्रजीतच प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. हा सारा तमाशा सुरू असतानाच एका प्रवाशाने त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी टीसीचं कौतुक केलं आहे की त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली ड्युटी प्रामाणिकपणे बजावली.

या घटनेतून हे लक्षात येते की विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची प्रतिमा केवळ गरीब किंवा अनभिज्ञ प्रवाशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. कोणत्याही वर्गातील व्यक्ती हा नियम मोडू शकते. सोशल मीडियावर या प्रकारावर जोरदार चर्चा सुरू असून नियम सर्वांसाठी सारखे असावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *