हिंजवडीत पावसाचे संकट टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; उपाययोजनांबाबत पाहणीसह बैठक

0
हिंजवडीत पावसाचे संकट टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; उपाययोजनांवर भर

हिंजवडीत पावसाचे संकट टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; उपाययोजनांवर भर

पुण्यातील हिंजवडीत पावसाळी पाण्याचा निचरा आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासन सज्ज; युद्धपातळीवर उपाययोजना सुरू.

टिकम शेखावत

पुणे, दि. १६ जून २०२५: हिंजवडी फेज १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्ती आणि नागरी सुविधांबाबत सोमवारी पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला आणि एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी पाहणी केली.

यानंतर हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन येथे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत पावसाळी पाण्याचा निचरा सुनिश्चित करण्यासाठी डॉल्फिन आणि साई प्रोविजो इमारतीजवळील तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

मेट्रो मार्गासह परिसरात पडलेला राडाराडा त्वरित हटवून त्याचे योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेशही दिले गेले. तसेच, नैसर्गिक नाल्यात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

बंद केलेले नैसर्गिक नाले खुले करावेत आणि मार्गातील राडारोडा दूर करावा, तसेच ड्रेनेज लाईनची स्वच्छता व दुरुस्ती करावी, असेही आदेश दिले गेले.

या बैठकीत पोलिस अधिक्षक अमोल तांबे, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास व परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, ११ जून २०२५ रोजी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले. हिंजवडी परिसरातील पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी घेतलेले हे उपाय येत्या पावसाळ्यात नागरिकांना आणि उद्योगधंद्यांना होणाऱ्या त्रासात मोठ्या प्रमाणात मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *