हिंजवडी IT पार्कमध्ये एनएसजी कमांडोंचा अचानक टेरेसवर उतरणे; मॉकड्रिलमुळे घबराट

0
हिंजवडी IT पार्कमध्ये एनएसजी कमांडोंचा अचानक टेरेसवर उतरणे; मॉकड्रिलमुळे घबराट

हिंजवडी IT पार्कमध्ये एनएसजी कमांडोंचा अचानक टेरेसवर उतरणे; मॉकड्रिलमुळे घबराट

पुण्याच्या हिंजवडी IT पार्कमध्ये एनएसजी कमांडोंनी हेलिकॉप्टरमधून कंपनीच्या टेरेसवर उतरण्यामुळे घबराट पसरली. ही कारवाई मॉकड्रिल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये बुधवारी एक अनपेक्षित आणि थरारक दृश्य पाहायला मिळाले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रोसेस कंपनीच्या आवारात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू येऊ लागला. काही क्षणातच हेलिकॉप्टरवरून एनएसजी कमांडो रोपच्या साह्याने थेट कंपनीच्या टेरेसवर उतरले. हे दृश्य पाहून परिसरातील कर्मचारी आणि नागरीकांमध्ये घबराट पसरली.

अनेकांनी याला दहशतवादी हल्ला समजून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. काही पालकांनी आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन करण्यास सुरुवात केली. या घडामोडीमुळे आयटी पार्कमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मात्र, काही वेळातच पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, ही संपूर्ण कारवाई एक मॉकड्रिल होती. अतिरेकी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी), गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस दल यांच्यातील समन्वयाची चाचणी घेण्यासाठी ही सराव कारवाई करण्यात आली होती.

यामध्ये विविध सुरक्षा यंत्रणांनी सहभाग घेतला होता. हे दृष्य खरेच जिवंत वाटावे इतके वास्तवदर्शी होते. एनएसजी कमांडो हत्यारांसह कंपनीच्या आवारात उतरले, परिसराला वेढा दिला आणि त्वरित शोध मोहीम हाती घेतली. यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती.

पोलीस प्रशासनाने नंतर पत्रकार परिषद घेऊन ही मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट केले आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती केली. यासारख्या सरावामुळे सुरक्षेची तयारी किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित होते. हिंजवडीतील या प्रकारामुळे आयटी क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *