जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; श्वानावर हल्ला

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; श्वानावर हल्ला
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे भरदिवसा बिबट्याने श्वानावर हल्ला केला. घरातील मुलांनी आरडाओरडा करून श्वानाला वाचवले, घटना थेट कॅमेऱ्यात कैद झाली.
सायली मेमाणे
पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची घटना घडली आहे. भरदिवसा बिबट्याने घराच्या अंगणात श्वानावर झडप घालली आणि त्यावर हल्ला केला. हा थरार थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. श्वानावर झालेल्या हल्ल्यामुळे घरातील मुलांनी आरडाओरडा करत आवाज दिला, ज्यामुळे श्वानाला वाचवता आले.
घटनेत बिबट्याने थेट घराकडे धाव घेतल्याचे देखील पाहायला मिळाले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाकडून योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अशा प्रकारच्या प्राण्यांच्या हालचालींमुळे मानववस्तीतील जीवसुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.
सध्या जुन्नर तालुक्यात बिबट्याचे दर्शन लोकांच्या घरी आणि शेजारील परिसरात वाढल्याचे पाहायला मिळते. वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्राणी आणि मानव यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
घटनेच्या कॅमेऱ्यातील व्हिडिओने सोशल मीडियावरही खळबळ उडवली आहे. नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची देखभाल करण्याची काळजी घ्यावी, तसेच जंगलातील प्राणी हालचालींमध्ये हस्तक्षेप टाळावा, असे तज्ज्ञ सुचवत आहेत. या प्रकारामुळे लोकांमध्ये जागरुकता वाढली असून, वन विभागाच्या तज्ज्ञांना स्थानिक उपाययोजनांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter