पुणे ग्रामीण पोलीस द्वारे आयोजित ५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५; तिसऱ्या दिवशी सातारा खेळाडूंचे वर्चस्व

पुणे
५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंगमध्ये सातारा खेळाडूंनी वर्चस्व राखत सुवर्णपदकांची कमाई केली; उपांत्य फेरीचे सामने सुरू.
बारामती, 20 नोव्हेंबर 2025: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आयोजित ५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ उत्साहात पार पडत असून तिसऱ्या दिवशी विविध स्पर्धांमध्ये उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळाले. १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान बऱ्हाणपुर (बारामती) येथील पोलीस उपमुख्यालयासह विविध मैदानांवर या स्पर्धा होत आहेत. दैनंदिन ताणतणावापासून दूर जात पोलीस कर्मचारी क्रीडा उत्सवाचा मनमुराद आनंद घेत आहेत.

तिसऱ्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये सातारा, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीण खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. पुरुष ३००० मी. स्टीपलचेसमध्ये हर्षवर्धन दबडे (सातारा), ४०० मी. धावण्यात संजय काळु गावीत (सातारा) आणि १५०० मी. धावण्यात ओंकार कुंभार (कोल्हापूर) यांनी सुवर्णपदके पटकावली. गोळाफेक पुरुष गटात ईशराक शेख (पुणे ग्रामीण) विजयी ठरले. पुरुषांच्या ४x४०० मी. व ४x१०० मी. रिले शर्यती सातारा संघाने जिंकल्या. महिलांमध्ये १५०० मी. धावण्यात सोनाली देसाई (कोल्हापूर), तर ४x४०० मी. आणि ४x१०० मी. रिले शर्यती सातारा संघाने मिळवल्या. गोळाफेकमध्ये माधवी यादव (सातारा) सुवर्ण विजेती ठरली.

वेटलिफ्टिंगमध्येही सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी आघाडी राखली. पुरुषांच्या सर्व वजनगटांमध्ये तेजस भोसले, निखील जनगाडे, गणेश देवरूखे, संतोष मुलुक, सचिन अडमाने, दीपक पोळ, स्वप्नील पाटील आणि समीर काशिद यांनी सुवर्ण पदके पटकावली. महिला गटात दामिनी सपकाळ, निकीता वाघ, वैष्णवी शिंदे, अपेक्षा किर्वे, मयुरी कुंभार, माधवी यादव, धनश्री भगत आणि कांचन टिकमकर यांनी सुवर्ण मिळवले.

पॉवरलिफ्टिंगमध्ये संकेत शेलार, गणेश देवरूखे, संतोष मुळीक, प्रतिक पाटील, विनायक डोंगरे व समीर काशिद यांनी पुरुष गटात; तर दामिनी सपकाळ, निकीता वाघ, सपना यमाजी, अपेक्षा किर्वे, मयुरी कुंभार, धनश्री मांडवे आणि कांचन टिकमकर यांनी महिला गटात सुवर्ण कामगिरी केली.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information