Central Railway Big Update: हिवाळी गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ, बुकिंग 30 नोव्हेंबरपासून
Central Railway Big Update: हिवाळी गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ, बुकिंग 30 नोव्हेंबरपासून
Central Railway Update: हिवाळ्यातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने शिर्डी, दौंड, सोलापूर मार्गांवरील विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली. बुकिंग 30 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध; 12 दिवसांचा मेगा ब्लॉकही जाहीर.
सायली मेमाणे
पुणे २८ नोव्हेंबर २०२५ : हिवाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान दरवर्षी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषत: धार्मिक पर्यटन, कौटुंबिक भेटी आणि नववर्ष सणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, सोलापूर आणि दौंड या मार्गांवर प्रवासीभार वाढलेला दिसतो. ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयात ट्रेन क्र. ०४७१५/०४७१६ बिकानेर–साईनगर शिर्डी–बिकानेर, ट्रेन क्र. ०९६२५/०९६२६ अजमेर–दौंड–अजमेर आणि ट्रेन क्र. ०९६२७/०९६२८ अजमेर–सोलापूर–अजमेर या तीन महत्त्वाच्या साप्ताहिक विशेष गाड्यांचा समावेश आहे. या तीनही गाड्यांच्या आधीच्या वेळापत्रकात केवळ नोव्हेंबरपर्यंतच फेऱ्या अधिसूचित होत्या. मात्र प्रवाशांच्या मागणीचा विचार करून डिसेंबर 2025 पर्यंत फेऱ्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
बिकानेर–साईनगर शिर्डी विशेष साप्ताहिक गाडी क्रमांक ०४७१५ जी २९ नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित होती, तिच्या ४ फेऱ्या वाढवून आता ६ ते २७ डिसेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच परतीची गाडी ०४७१६ साईनगर शिर्डी–बिकानेर, जी आधी ३० नोव्हेंबरपर्यंत होती, तिच्याही ०७ ते २८ डिसेंबर या कालावधीतील ४ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान, अजमेर–दौंड साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९६२५ जी २७ नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित होती, तिच्याही फेऱ्या वाढवून ०४ ते २५ डिसेंबरदरम्यान आणखी ४ ट्रिप्स चालवण्यात येणार आहेत. याच मार्गावरील परतीची गाडी ०९६२६ दौंड–अजमेर आता ०५ ते २६ डिसेंबरदरम्यान ४ नव्या फेऱ्यांसह धावेल.
अजमेर–सोलापूर विशेष गाडी क्रमांक ०९६२७ जी आधी २६ नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित होती, ती आता ०३ ते ३१ डिसेंबरदरम्यान ५ फेऱ्या वाढवून चालेल. परतीची गाडी ०९६२८ सोलापूर–अजमेर या मार्गावरही ०४ डिसेंबरपासून ०१ जानेवारी 2025 पर्यंत एकूण ५ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना हिवाळ्यातील गर्दीचा मोठा त्रास टळणार असून शिर्डी, सोलापूर आणि राजस्थानकडे जाणाऱ्या लोकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.
या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग ३० नोव्हेंबर २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. विशेष गाड्यांमध्ये विशेष शुल्क लागू असणार असून प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठीही एक महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर ठाणे–कल्याणदरम्यान रविवार 10.40 ते 3.40 या वेळेत 12 दिवसांचा मेगा ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्दही राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसला तरी बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असेल. याशिवाय बदलापूर स्टेशनवर २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान मध्यरात्री २ ते ३.३० या वेळेत गर्डर उभारणीमुळे कामकाज थांबवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे हिवाळ्यातील प्रवास अधिक सुकर होईल आणि गर्दीचा भार कमी करण्यात प्रशासनाला मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information