G-7 Summit: पंतप्रधान मोदी कॅनडात दाखल; महत्त्वाच्या जागतिक नेत्यांशी बैठक, खलिस्तान मुद्द्यावरही चर्चा अपेक्षित

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल; जॉर्जियो मेलोनी, झेलेन्स्की आणि मॅक्रॉन यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांशी बैठक अपेक्षित.

सायली मेमाणे

१७ जून २०२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जून रोजी कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी कनानास्किस येथे दाखल झाले. या परिषदेमध्ये अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि कॅनडा या प्रमुख देशांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा केवळ जागतिक चर्चेसाठी महत्त्वाचा नसून, भारताच्या द्विपक्षीय संबंधांनाही नवे वळण देणारा मानला जात आहे. या शिखर परिषदेमध्ये मोदी यांची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे नव्याने नियुक्त झालेले पंतप्रधान केयर स्टारमर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ, मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासह द्विपक्षीय चर्चा होणार आहेत.

गेल्या दशकात पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला कॅनडा दौरा असून ते सलग सहाव्यांदा जी-७ परिषदेत सहभागी होत आहेत. त्यांचे कॅनडा दौरेतील आगमन कॅल्गरीमध्ये रात्री उशिरा झाले आणि नंतर ते जी-७ परिषदेसाठी कनानास्किसकडे रवाना झाले. विशेष म्हणजे, भारताच्या पंतप्रधानांनी गेल्या २० वर्षांनंतर प्रथमच सायप्रसला भेट दिली आहे. त्यावेळी सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले आणि त्यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ प्रदान केला. या भेटीदरम्यान उद्योगपतींबरोबर झालेल्या चर्चेत मोदींनी भारत-सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराच्या संधींवर भर दिला.

दरम्यान, जी-७ शिखर परिषद सुरू असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना परिषद अर्धवट सोडून मध्य पूर्वेतील घडामोडींमुळे परत यावे लागले. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात नियोजित बैठक रद्द झाली. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी केवळ ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्यासोबत व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि नंतर लगेच अमेरिका रवाना झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जी-७ व्यासपीठावर थेट चर्चा घडून आली नाही.

कॅनडामधील पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानवाद आणि व्यापार यांमधील संबंधांवर भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, जर कॅनडाने जागतिक व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावायची असेल, तर देशातील खलिस्तानी तत्त्वांना आळा घालणे अपरिहार्य ठरेल. त्यांनी खलिस्तान ट्रकिंग नेटवर्कद्वारे अंमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक सुरक्षिततेवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले. बोर्डमन यांच्या मते, भारतासारख्या देशांशी विश्वासपूर्ण व्यावसायिक संबंध ठेवायचे असतील, तर कॅनडाने आपल्यातील अतिरेकी गटांविरोधात ठोस पावले उचलली पाहिजेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा कॅनडा दौरा फक्त राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. जागतिक पातळीवर भारताच्या उपस्थितीला बळकटी देण्यासाठी या दौऱ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसेच, खलिस्तानविरोधातील भारताच्या भूमिका आणि जागतिक व्यासपीठावरील मतप्रदर्शन यातून येत्या काळात भारत-कॅनडा संबंधांचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

G7Summit #ModiInCanada #PMModi #IndiaCanadaRelations #KhalistanIssue #ModiDiplomacy #G7Leaders2025 #NarendraModi #ModiAbroad #GlobalIndia #IndiaOnGlobalStage #ModiInCyprus #GeoPolitics #WorldNews #NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed