नावाजलेल्या साने गुरुजींच्या शाळेची दयनीय अवस्था; लाख खर्चूनही इमारतीत गळती

1
दापोली : २७ लाख खर्चूनही साने गुरुजींच्या शाळेची गळकी अवस्था, ग्रामस्थांचा संताप

दापोली : २७ लाख खर्चूनही साने गुरुजींच्या शाळेची गळकी अवस्था, ग्रामस्थांचा संताप

दापोली तालुक्यात २७ लाख खर्चूनही साने गुरुजींच्या शाळेची इमारत अपूर्ण, गळती सुरू; ग्रामस्थ व पालकांनी कामाच्या निकृष्ट दर्जावर उपस्थित केला सवाल.

सायली मेमाणे

दापोली १७ जून २०२५ : दापोली तालुक्यातील पालगड हे गाव थोर समाजसुधारक साने गुरुजी यांचे जन्मगाव आहे. याच गावातील जिल्हा परिषद शाळा क्र. 1, जिथे साने गुरुजी यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते, तिचे सध्या मोठ्या प्रमाणावर डागडुजी व नुतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी तब्बल २७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असून इमारत अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यातच शाळेत पाणी गळती सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक ग्रामस्थ व पालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एवढा मोठा निधी खर्च करूनही जर शाळा विद्यार्थ्यांना सुरक्षित आसरा देऊ शकत नसेल, तर अशा कामाचा उपयोग काय? अनेक पालकांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली असून, छतावरून पाणी गळती होत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. शाळेतील वर्गखोल्यांत पाणी साचत असल्याने लहान मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे.

ग्रामस्थ व सरपंचांनीही या विषयाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कामाच्या दर्जावर कोणतीही देखरेख झाली नाही का? असा सवाल विचारला जात आहे. विद्यार्थ्यांचा पहिला शाळेचा दिवस साजरा करायचा तरी कुठे? पावसात उभं राहून स्वागत करायचं का? असा उपरोधिक प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

साने गुरुजी यांच्याशी निगडित असलेल्या या ऐतिहासिक शाळेची अशी दुरवस्था होणे हे केवळ शिक्षण यंत्रणेसाठीच नव्हे, तर प्रशासनासाठीही लाजिरवाणं आहे. एका बाजूला शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणि डिजिटल इंडिया या घोषणा दिल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला अशा प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधा सुद्धा नसणं हे दुर्दैव आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच उर्वरित काम दर्जेदार आणि तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी देखील शासनाकडे केली जात आहे. साने गुरुजींची स्मृती जपणाऱ्या या शाळेची अशी उपेक्षा होणे हे गावकऱ्यांसाठी भावनिकदृष्ट्याही वेदनादायक ठरत आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

सानेगुरुजी #पालगड #दापोली #शाळेचेबांधकाम #जिल्हापरिषदशाळा #शिक्षणव्यवस्था #शाळेचीगळती #ग्रामस्थसंताप #शिक्षणसमस्या #मुलांचाअधिकार #निकृष्टबांधकाम #महाराष्ट्रशिक्षण #शाळांचेदुरुस्ती #शिक्षणहक्क #SanegurujiSchool #ZPSchool #PalgadSchoolIssue

1 thought on “नावाजलेल्या साने गुरुजींच्या शाळेची दयनीय अवस्था; लाख खर्चूनही इमारतीत गळती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed