महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर : राधानगरी धरणातून 2500 क्युसेक विसर्ग, कोकणात संपर्क तुटला

0
राधानगरी धरणातून 2500 क्युसेक विसर्ग, कोकणात संपर्क तुटला

राधानगरी धरणातून 2500 क्युसेक विसर्ग, कोकणात संपर्क तुटला

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, राधानगरी धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. कोकणातील नद्यांना पूर आला असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे.

सायली मेमाणे

१७ जून २०२५ : राज्यात विविध भागांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नद्या धोक्याची पातळी पार करत असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कुंभी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातूनही 300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा आणि कुंभी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातील जगबुडी, कोदवली, शास्त्री आणि असावी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, काही ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कणकवली-आचरा राज्य मार्गावर पूरपाण्यामुळे सकाळपासून वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल आठ तास ही वाहतूक बंद राहिली.

दरम्यान, हवामान विभागाने पुणे, लोणावळा परिसरात ‘रेड अलर्ट’ दिला आहे. घाटमाथ्यावरील पर्यटकांनी काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. पावसामुळे पाणी पातळी झपाट्याने वाढून डॅम वाहू लागला आहे. त्यामुळे भुशी डॅम परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली.

विदर्भातील अनेक भागांत मात्र अजूनही मान्सूनची प्रतीक्षा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर या भागांमध्ये तुरळक पावसाचे सरी आढळत आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ३-५ दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असाच पाऊस कोसळण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करावी, असेही सांगण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

#महाराष्ट्रपाऊस #धरणविसर्ग #RainAlert #कोकणपूर #BhushiDam #RadhanagariDam #WeatherUpdate #HeavyRainfall #MonsoonAlert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed