Stop It Guys ! पापाराझीवर प्रचंड भडकली सामंथा

0
सामंथा रुथ प्रभूचा जिमबाहेरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामंथा रुथ प्रभूचा जिमबाहेरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Samantha Angry on Paps Outside Her Gym: शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या सामंथा रुथ प्रभूचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जिमबाहेर तिने पापाराझींवर थेट राग व्यक्त करत “Stop it guys!” असं म्हणत संताप व्यक्त केला.

सायली मेमाणे

मुंबई १७ जून २०२५ : सामंथा रुथ प्रभू ही तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौम्य आणि नम्र वागणुकीसाठी ओळखली जाते. मात्र नुकताच एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सामंथा तिच्या सामान्य स्वभावाच्या अगदी विरोधात वागताना दिसतेय.

मुंबईतील वांद्रे परिसरातल्या एका जिमबाहेर ती नियमितप्रमाणे आली होती. पापाराझींनी तिच्या फोटोसाठी गर्दी केली आणि ‘गुड मॉर्निंग’ म्हणायला सुरुवात केली. परंतु सामंथा यावेळी फारशी उत्साही दिसली नाही. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती आणि तिनं थेट “Stop it guys… Please!” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.

व्हिडिओमध्ये ती एका हातात पाण्याची बाटली आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन फोनवर बोलताना दिसते. या काळात तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. त्यामुळे अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली की, कदाचित तिच्या आयुष्यात काही गंभीर घडलेलं असावं.

या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना सामंथाच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटतंय, काहींनी तिच्यावर टीका केली आहे, तर काहींनी तिची बाजू घेत समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

एका युजरने लिहिलं की, “नवीन चित्रपट येऊ द्या, वागणं बदलतं“, तर दुसऱ्याने म्हटलं, “चित्रपट फ्लॉप झाल्यावरही इतका अॅटीट्यूड कुठून येतो?” काहीजण तर तिच्या वजनावरही चर्चा करताना दिसले – “वजन कमी केल्यामुळे ती आता चांगली दिसत नाही“, असंही काहींनी म्हटलं आहे.

तरीही तिच्या कट्टर चाहत्यांना तिची खूप काळजी वाटत आहे. “ती फोनवर कोणाशी तरी गडबडीत बोलत होती आणि चेहऱ्यावर तणाव होता, त्यामुळेच तिने राग व्यक्त केला असावा,” असं अनेकांनी सांगितलं आहे.

प्रोफेशनल बाजूला ठेवून तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहिलं, तर सध्या तिचं नाव ‘सिटाडेल: हनी बनी’ या प्रोजेक्टच्या दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी जोडलं जात आहे. दोघांचे एकत्र फोटोही सामंथाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, अद्याप या नात्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा तिने केलेली नाही.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

#SamanthaRuthPrabhu #StopItGuys #ViralVideo #Paparazzi #SamanthaNews #SamanthaAngry #SamanthaGymVideo #CelebrityNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed