शेकडो भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचे प्रयत्न, इराणमधील दूतावासाचे पाऊल
शेकडो विद्यार्थ्यांच्या सुटकेचे प्रयत्न, भारताच्या विनंतीनंतर इराणमधील दूतावासाचे पाऊल
Israel–Iran Conflict दरम्यान इराणमधील तेहरान शहरात अडकलेल्या सुमारे 1500 भारतीय विद्यार्थ्यांना भारताच्या विनंतीनंतर कोम प्रांतात हलवण्यात येत आहे. भारत सरकार आणि दूतावास सतत संपर्कात.
सायली मेमाणे
१७ जून २०२५ : Israel-Iran Conflict दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणमधील तेहरान शहरात सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी मुख्यतः वैद्यकीय शिक्षणासाठी इराणमध्ये दाखल झाले असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर काश्मिरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारत सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इराण सरकारशी तात्काळ संपर्क साधला होता. त्यानंतर इराण सरकारने दिलेल्या प्रतिसादानुसार या विद्यार्थ्यांना रस्तामार्गे तेहरानहून कोम प्रांतात हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोम हा तुलनेने सुरक्षित मानला जाणारा भाग असल्याने विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात तेथे स्थलांतरित केले जात आहे. तेहरान विमानतळ सध्या बंद असल्याने हवाईमार्ग शक्य नसल्याने हा पर्याय निवडण्यात आला आहे. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की इराणमधील भारतीय दूतावास सतत संपर्कात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जात आहे. काही विद्यार्थ्यांना इराणमध्येच इतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे आणि या प्रक्रियेसाठी दूतावासाची मदत घेतली जात आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की काही पर्यायी मार्गांवर विचार सुरू असून योग्य त्या वेळी अधिक माहिती जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांच्या समुदायांतील नेत्यांशी दूतावासाने थेट संवाद ठेवलेला आहे. भारतीय दूतावासाने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर देखील सुरक्षा सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अझरबैझान सरकारनेही महत्त्वपूर्ण मदत केली आहे. इराणमध्ये अडकलेल्या विविध देशांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अझरबैझानच्या अस्तारा सीमेवरून नागरिकांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यात आले. कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, पोर्तुगाल, फिनलंड आणि फिलिपिन्स या देशांच्या नागरिकांनी सीमा ओलांडून अझरबैझानच्या राजधानी बाकू विमानतळाकडे प्रयाण केले. इराणमधील अझरबैझानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि अन्य नागरिक अशा एकूण ४१ जणांना सुरक्षितरित्या त्यांच्या देशात परत आणण्यात आले, अशी माहिती अझरबैझानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
दरम्यान, पॅरिस एअर शोमध्ये इस्रायलच्या संरक्षण विभागाच्या दालनांभोवती काळ्या भिंती उभारण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला आहे. रविवारी रात्री या भिंती उभारण्यात आल्या आणि त्यामुळे इस्रायलचे दालने इतरांपासून वेगळी झाली. या घटनेबाबत इस्रायल सरकारने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून फ्रान्स सरकारने ही भिंती त्वरित हटवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी हा प्रकार अपमानास्पद असल्याचे स्पष्ट करत फ्रान्सच्या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे. Israel-Iran Attacks मुळे मध्यपूर्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता वाढत असतानाच भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेली ही तातडीची कृती निश्चितच उल्लेखनीय आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
#IsraelIranAttacks #IndianStudentsInIran #IranCrisis #IndianEmbassy #BreakingNewsMarathi