Kolhapur Crime News: धार्मिक संस्थेत अल्पवयीनाची शॉक देऊन हत्या, सुट्टीसाठी केला कट
धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या; सुट्टीसाठी शॉक देऊन संपवले
Kolhapur Crime News: हातकणंगले तालुक्यात धार्मिक संस्थेत एका अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या. सुट्टीसाठी classmates ने रचला कट. तपासात धक्कादायक माहिती उघड.
सायली मेमाणे
१८ जून २०२५ :कोल्हापूर Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात एक धक्कादायक घटना घडली असून, धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत एका ११ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याची झोपेत असताना हत्या करण्यात आली आहे. मृत मुलाचे नाव फैजान नाजिमा असून तो मूळचा बिहारचा रहिवासी होता. फैजानच्या तोंडात बोळा कोंबून त्याला इलेक्ट्रिक वायरद्वारे शॉक देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, संस्थेतीलच दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने ही हत्या केली असून, त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. फैजानचा मृत्यू रविवारी रात्री झोपेत झाला. आरोपीने हा कट इतर दोन मुलांसोबत मिळून रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यांच्याकडूनही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी वाल निरीक्षणगृहात केली आहे. संस्थेच्या सुट्टीसाठी हा क्रूर कट रचल्याचं कारण चौकशीत समोर आलं असून, या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फैजानची हत्या सुट्टी मिळावी म्हणून करण्यात आली असून, त्यासाठी वायर कुठून आणली गेली, वापरून झाल्यावर ती कुठे लपवली गेली, याचा तपासही सुरू आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz