सोलापूर हादरले! ‘आम्ही भाऊ-बहीण’ म्हणत दोघांनी एकाच ओढणीने घेतला गळफास; रहस्यमयी चिठ्ठीमुळे पोलिसही गोंधळले.

1
सोलापूर हादरले! 'आम्ही भाऊ-बहीण' म्हणत दोघांनी एकाच ओढणीने घेतला गळफास

सोलापूर हादरले! 'आम्ही भाऊ-बहीण' म्हणत दोघांनी एकाच ओढणीने घेतला गळफास

सोलापूरमध्ये रोहित ठणकेदार व अश्विनी केशापुरे यांनी एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत त्यांनी स्वतःला भाऊ-बहीण म्हणत संशय न घेण्याची विनंती केली.

सायली मेमाणे

सोलापूर १२ जून २०२५ : सोलापूरच्या कर्णिक नगर परिसरात घडलेली एक अत्यंत हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. रोहित ठणकेदार (२३) आणि अश्विनी केशापुरे (२३) या दोघांनी एकाच ओढणीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, या आत्महत्येमागील कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

प्रारंभी हे कदाचित प्रेमसंबंधातून घडले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र पोलिसांना घटनास्थळी सापडलेली चिठ्ठी या प्रकरणाला पूर्णतः वेगळे वळण देते. या चिठ्ठीत लिहिले आहे की, “आम्ही भाऊ-बहीण आहोत. आमच्या आत्महत्येस कोणताही दोष देऊ नका. आई-वडील जबाबदार नाहीत.” अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मांडल्याने हे प्रेमप्रकरण नसून, आत्महत्येमागे कोणते तरी अज्ञात, खोलवर कारण असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

चिठ्ठीमुळे रोहित आणि अश्विनी यांच्यात खरोखरच भावंडासारखे नाते होते का, यावर नातेवाईकांनीही दुजोरा दिला आहे. रोहितने अश्विनीला लहान बहिणीप्रमाणे मानले होते. आत्महत्येच्या आदल्याच दिवशी दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर ‘भाऊ-बहीण’ असल्याचे स्टेटस अपडेट केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सोशल मीडियावरील त्या स्टेटसचा त्यांच्या निर्णयाशी काही संबंध आहे का, याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत.

या धक्कादायक घटनेने ठणकेदार आणि केशापुरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहित हा ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता, तर अश्विनीने बी. फार्मसीचे शिक्षण घेतले होते. दोघांचे पार्श्वभूमी वेगवेगळे असले तरी त्यांचे बंध खूप घट्ट होते, असे परिसरातील लोक सांगत आहेत.

पोलीस अधिकारी सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मोबाईल डेटा, सोशल मीडिया संदेश, आणि दोघांचे कॉल रेकॉर्ड्स यावरून आत्महत्येमागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेने आत्महत्येतील सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक घटक पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “सोलापूर हादरले! ‘आम्ही भाऊ-बहीण’ म्हणत दोघांनी एकाच ओढणीने घेतला गळफास; रहस्यमयी चिठ्ठीमुळे पोलिसही गोंधळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed