अभिनेता तुषार घाडीगावकर याचं आत्महत्येने जीवनात टोकाचं वळण; मराठी कलाविश्व हादरलं

1
अभिनेता तुषार घाडीगावकर याने गुरुवारी मुंबईतील भांडूपमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर

अभिनेता तुषार घाडीगावकर याने गुरुवारी मुंबईतील भांडूपमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर

अभिनेता तुषार घाडीगावकर याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर; अनेक मालिकांत झळकलेला चेहरा.

सायली मेमाणे

२१ जून २०२५ : मराठी मालिकांतून घराघरात पोहोचलेला अभिनेता तुषार घाडीगावकर याने गुरुवारी मुंबईतील भांडूपमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोणतेही नवीन काम न मिळाल्यामुळे तो खोल नैराश्यात होता. यातूनच त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनं संपूर्ण मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुषार घाडीगावकर याने ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या या लोकप्रिय कलाकाराने ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याने ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही सशक्त भूमिका साकारली होती. नुकतीच ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेतही तो झळकला होता.

तुषार मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा असून त्याचे शिक्षण मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये झाले. तिथल्या नाट्यविभागात तो ओळखला जाणारा तरुण होता. मित्रांमध्ये ‘घाड्या’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या तुषारने इतक्या कमी वयात जीवन संपविल्याने त्याच्या सहकाऱ्यांत आणि चाहत्यांत शोककळा पसरली आहे.

त्याच्या अकस्मात निधनावर सहकलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेता अंकुर वाढवेने भावनिक पोस्ट करत म्हटले, “मित्रा का? कश्यासाठी? कामं येतात जातात. आपण मार्ग काढायला हवा. आत्महत्या हा मार्ग नाही. तुझा निर्णय खूप वेदनादायक आहे.” तर ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले म्हणाले, “माणसं आतून खूप तुटलेली असतात… अपेक्षा आणि वास्तव जमत नाही… लोक ऐकत नाहीत, आपुलकी राहत नाही. ही माणसं नंतर एकटी पडतात का?”

तुषारच्या आत्महत्येने मनोरंजन क्षेत्रातील मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. अनेक नवोदित कलाकार नैराश्य, अस्थिरतेचा सामना करत असताना योग्य सल्ला, आधार आणि समुपदेशन मिळावं, ही मागणी यानिमित्ताने समोर येते आहे.

Do-follow Links:
🔗 Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
🔗 YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
🔗 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
🔗 Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “अभिनेता तुषार घाडीगावकर याचं आत्महत्येने जीवनात टोकाचं वळण; मराठी कलाविश्व हादरलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed