नवी मुंबई महापौर निवड 2026: 5 फेब्रुवारीला शहराला मिळणार 13 वा महापौर, दोन महिला उमेदवार आघाडीवर

0
नवी मुंबई महापौर निवड 2026: 5 फेब्रुवारीला शहराला मिळणार 13 वा महापौर, दोन महिला उमेदवार आघाडीवर

नवी मुंबई महापौर निवड 2026: 5 फेब्रुवारीला शहराला मिळणार 13 वा महापौर, दोन महिला उमेदवार आघाडीवर

Navi Mumbai Mayor News: नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीची तारीख जाहीर. 5 फेब्रुवारी 2026 रोजी शहराला 13 वा महापौर मिळणार. माधुरी सुतार आणि नेत्रा शिर्के आघाडीवर.

पुणे 2६ जानेवारी २०२६ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून शिगेला पोहोचली होती. अखेर या बहुचर्चित निवडीबाबतची तारीख निश्चित झाली असून, येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी मुंबईला नवीन महापौर मिळणार आहे. नवनिर्वाचित महापौर हा नवी मुंबई शहराचा 13 वा महापौर असणार आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात या निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे.

महापौर निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. यंदा महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आले असल्याने महिला नगरसेविकांमध्ये ही चुरस अधिक वाढली आहे. सध्या या शर्यतीत भाजपच्या माधुरी सुतार आणि नेत्रा शिर्के या दोन नगरसेविकांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या महत्त्वाच्या पदाबाबतचा अंतिम निर्णय कोण घेणार, याबाबतही मोठी उत्सुकता आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हेच महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या सूचनेनुसार ठरलेला उमेदवारच नवी मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल, असे बोलले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून शहराच्या राजकारणावर गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. अनेक वर्षे त्यांनी नवी मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकासकामांना गती मिळाली. अलीकडील काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, झालेल्या निवडणुकांच्या निकालातून नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा गणेश नाईक यांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले.

आता नव्या महापौराच्या निवडीनंतर नवी मुंबईतील विकासाच्या मुद्द्यांकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. विशेषतः पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न, सिडकोच्या घरांचा रखडलेला विषय आणि भाजपने निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या नवी मुंबईसाठीच्या विकास वचननाम्यातील आश्वासने प्रत्यक्षात कधी आणि कशा पद्धतीने पूर्ण होतात, यावर आगामी महापौर कार्यकाळाचे मूल्यमापन होणार आहे.

नव्या महापौराकडून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांचा ताण, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधा या सर्व प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी होणारी महापौर निवड ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया न राहता, नवी मुंबईच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. आता या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed