दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी 54 रायडर्स तैनात; हेल्पलाईनवर एक कॉल पुरेसा

0
दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी 54 रायडर्स तैनात; हेल्पलाईनवर एक कॉल पुरेसा

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी 54 रायडर्स तैनात; हेल्पलाईनवर एक कॉल पुरेसा


दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचा विशेष उपक्रम. 54 रायडर्स, हेल्पलाईन व व्हॉट्सॲप सेवा सुरू.


पुणे ०७ जानेवारी २०२६ : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत आणि सुरक्षित पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने एक अनोखा आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक उपक्रम राबवला आहे. माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून, परीक्षेच्या काळात अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ५४ ‘रायडर्स’ तैनात करण्यात आले आहेत.

परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी किंवा अचानक उद्भवलेल्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचा ताण वाढतो. ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष मदत यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक (१० वी) आणि उच्च माध्यमिक (१२ वी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील १ ते ५ परिमंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण १२६ परीक्षा केंद्रे तर इयत्ता १० वी साठी २२३ परीक्षा केंद्रे आहेत.

या सर्व परीक्षा केंद्रांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी ५४ रायडर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अडचण आल्यास थेट वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.

१८ वाहतूक युनिट्समध्ये स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध

नियंत्रण कक्षात ३ विशेष वाहने तैनात

वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर केले जातील आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवले जाईल.

ही विशेष सेवा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध असून, पालक व नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed