म्हाळुंगे–नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय; गणेश बोत्रे व आश्वनि तरस चमके

0
म्हाळुंगे–नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय; गणेश बोत्रे व आश्वनि तरस चमके

म्हाळुंगे–नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय; गणेश बोत्रे व आश्वनि तरस चमके


खेड तालुक्यातील म्हाळुंगे–नाणेकरवाडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांनी भरघोस मताधिक्याने विजय मिळवला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जल्लोष आणि आनंदोत्सवाचे वातावरण


पुणे १० जानेवारी २०२६ : पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील जनतेचे लक्ष म्हाळुंगे–नाणेकरवाडी गटातील निकालाकडे लागले होते. निकाल जाहीर होताच खेड तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पै. गणेश कांताराम बोत्रे पाटील आणि पंचायत समिती सदस्यपदी आश्वनि सोमनाथ तरस यांनी भरघोस मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या गटातील आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून संपूर्ण तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजयानंतर माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते यांनी गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा सत्कार करून कौतुक केले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नाणेकरवाडी येथील तळेगाव चौकात ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांचा आतिषबाजी आणि भंडारा उधळून गणेश बोत्रे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यशानंतर त्यांनी खराबवाडी, म्हाळुंगे, खालुब्रे येथील ग्रामदैवत जोपाईदेवीचे दर्शन घेतले, तसेच येलवाडी येथील संत भागीरथी माता दर्शन करून सांगुर्डी प्लॉटिंग, इंद्रायणी रिव्हर पार्क सोसायटी परिसरात भेट दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती नोंदवली गेली.

गणेश दादा एकच वादा” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी येलवाडीचे सरपंच आणि खेड बाजार समिती सदस्य रणजित गाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. येलवाडी, सांगुर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयानंतर संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली असून, खेड तालुक्यातील राजकारणासाठी हा निकाल निर्णायक ठरला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पुढील राजकीय योजना आणि उपक्रम यशस्वी रित्या राबविण्याची तयारी सुरू आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *